Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • वणी
  • माजी आमदार बोदकुरवार यांच्या उपस्थितीत प्रभाग ५ मध्ये भाजपाचा जोरदार प्रचार
  • वणी
  • राजकीय

माजी आमदार बोदकुरवार यांच्या उपस्थितीत प्रभाग ५ मध्ये भाजपाचा जोरदार प्रचार

NewWaniDiary 23/11/2025

वणी (प्रतिनिधी): वणी नगर परिषद निवडणूक २०२५ अंतर्गत प्रभाग क्रमांक ५ मध्ये दि. २२ व २३ नोव्हेंबर रोजी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार विद्या खेमराज आत्राम यांच्या प्रचारार्थ भाजपाचे नेते व माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या नेतृत्वाखाली जोरदार, भव्य प्रचार राबविण्यात आला. प्रभागातील उमेदवार सोनाली प्रशांत निमकर (महिला गट) आणि रितिक मामिडवार (पुरुष आरक्षित SC गट) यांच्या समर्थनार्थ झालेल्या या प्रचाराला मतदारांकडून प्रतिसाद मिळत असून ढोल-ताशांच्या गजरात घेतलेल्या मतदार भेटींमुळे संपूर्ण प्रभागात उत्सवाचे वातावरण निर्माण झाले.

माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी तेली फैल, सिंघी कॉलनी, ग्रामीण रुग्णालय परिसर, भीमनगर, दामले नगर, शेतकरी मंदिर रोड या भागांत मोठ्या संख्येने नागरिकांशी संवाद साधत विविध विकासकामांची माहिती दिली.

काही ठिकाणी उमेदवार सोनाली प्रशांत निमकर यांचे नागरिकांनी घरासमोर उत्साहाने स्वागत केले. माजी नगरसेवक छोटू निमकर यांनी तेली फैल व परिसरातील केलेल्या विकासकामांचा उल्लेख करत मतदारांशी थेट संवाद साधला. त्यामुळे प्रभाग क्रमांक ५ मध्ये नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार विद्या आत्राम व प्रभागातील उमेदवार सोनाली निमकर हे तेली फैल,सिंघी कॉलनी परिसरात आघाडीवर असल्याचे चित्र दिसत आहे.

या प्रचारात माजी नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे, शहराध्यक्ष अ‍ॅड. निलेश चौधरी, विलास निमकर, तसेच प्रभागातील माजी नगरसेवक छोटू निमकर यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने सहभागी झाले.

Continue Reading

Previous: MIMचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला पाठिंबा; वणीतील राजकीय गणितात मोठा बदल
Next: वणीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची २६ नोव्हेंबरला जाहीर सभा; शहरात उत्साहाची लाट

Related Stories

SAVE_20260226_131159_11zon
  • वणी
  • घोन्सा

आदर्श हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, घोन्सा येथे माजी विद्यार्थी स्नेहमिलन उत्साहात

NewWaniDiary 26/02/2026
SAVE_20260225_203542_11zon
  • वणी

वनाधिकार कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणी साठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व किसान सभेने केले आंदोलन

NewWaniDiary 25/02/2026
SAVE_20260223_232242-1024x678.jpg
  • महाराष्ट्र
  • वणी

रायगड किल्ला येथे स्वच्छता अभियान; शिवसैनिकांकडून दोन महापुरुषांना मानवंदना

NewWaniDiary 23/02/2026
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.