Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • वणी
  • आंबेडकर जयंती रॅलीत बाटली हल्ला: जवानाच्या पत्नीला दुखापत, आरोपी अद्याप मोकाट!
  • वणी

आंबेडकर जयंती रॅलीत बाटली हल्ला: जवानाच्या पत्नीला दुखापत, आरोपी अद्याप मोकाट!

NewWaniDiary 10/05/2025

वणी : १४ एप्रिल रोजी वणी शहरातील दामले नगर वार्डातून सायंकाळी ६ वा. काढण्यात आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती रॅलीदरम्यान, अज्ञात व्यक्तीने तेली फैल येथील एन.के. बारसमोर काचाची दारूची बाटली फेकली. ही बाटली रॅलीतील एका भारतीय सैन्यात कार्यरत जवानाच्या पत्नीला लागून डोक्याला दुखापत झाली.
या घटनेनंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच १५ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता, सैन्याच्या पत्नीने व त्याच्यासोबत समाजबांधवांनी वणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. मात्र, पोलीस फक्त वरवर चौकशी करून प्रकरण दाबल्याचे आरोप नागरिकांकडून होत आहेत.
घटनेला आता काही दिवस उलटले असतानाही संबंधित आरोपी अद्याप मोकाट आहे. यामुळे आंबेडकरी समाजात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, अशा घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी तत्काळ कारवाई करावी, अशी ठाम मागणी समाजबांधवांकडून केली जात आहे.
“जाणीवपूर्वक शांततापूर्ण रॅलीत अशा प्रकारचा हल्ला करून वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न झाला असून, याची गांभीर्याने दखल घेऊन दोषींवर कठोर कारवाई करावी,” असे आवाहनही करण्यात आले आहे.

Continue Reading

Previous: जी.आर.एन.कंपनीने दिलेला शब्द फिरविल्याने भाकपने आज पुन्हा उपसले आंदोलनाचे हत्यार.. ‌
Next: अहंकारावर नियंत्रण ठेवून आपण समाधानी जीवन जगूया..

Related Stories

ChatGPT Image Sep 1, 2026, 05_25_56 PM_11zon
  • वणी

संजय खाडेंनी लावून धरला प्रश्न; वणी–उकणी बससेवा अखेर सुरू

NewWaniDiary 01/09/2026
ChatGPT Image Aug 27, 2026, 03_28_47 PM_11zon
  • वणी

जम्मू खान यांचा सेवाभावी उपक्रम; ४१ गरजू विद्यार्थ्यांना नवीन सायकलींचे वाटप

NewWaniDiary 27/08/2026
ChatGPT Image Aug 25, 2026, 01_40_53 PM_11zon
  • वणी

प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जन्मदिनानिमित्त वणीत भव्य रक्तदान शिबिर

NewWaniDiary 25/08/2026
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.