Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • वणी
  • जी.आर.एन.कंपनीने दिलेला शब्द फिरविल्याने भाकपने आज पुन्हा उपसले आंदोलनाचे हत्यार.. ‌
  • वणी

जी.आर.एन.कंपनीने दिलेला शब्द फिरविल्याने भाकपने आज पुन्हा उपसले आंदोलनाचे हत्यार.. ‌

NewWaniDiary 10/05/2025

वणी : जी.आर.एन.कंपनीत बेलोरा(निलजई)परिसरातील स्थानिक बेरोजगारांना प्राधान्यक्रमाने सामावुन घेण्यासाठी मागे 25 ते 27 एप्रिल 2025 ला भारतीय‌ कम्युनिस्ट पक्षाचे नेत्रुत्वात कंपनीसमोर बेमुदत धरणा आंदोलन करण्यात आले होते.आंदोलनाची दखल घेऊन क्षेत्रीय महाव्यवस्थापक,सबेरीया मॅनेजर,कंपनी प्रतीनिधी व भाकप प्रतिनीधींच्या बैठकीत कंपनीने परिसरातील 35 बेरोजगारांना काम देण्याचे आश्वासन देऊन आंदोलन मागे घेण्याची विनंती केली होती.त्यानुसार आंदोलन मागे घेण्यात आले होते.आता कंपनीने आपला शब्द फिरवत फक्त ड्रायव्हर बेरोजगारांनाच घेऊ असे सांगत आहेत इतर लेबरचे काम स्थानिकांना देण्यासाठी टाळाटाळ करीत आहे.भाकपचे असे म्हणने आहे कि कंपनीने प्राधान्यक्रमाने स्थानिक युवकांना कामे द्यावीत तसा शब्दही कंपनीने दिला होता. ठरलेल्या तारखेपर्यंत आमची मागणी पुर्ण न झाल्याने भाकपने पुन्हा आजपासुन कामबंद आंदोलनाला सुरुवात केली आहे.

भाकपचे वणी विधानसभा नेते काॅ.अनिल हेपट,जिल्हासचिव काॅ.अनिल घाटे,शिंदोला जि.प.सर्कलचे नेते काॅ.मोरेश्वर कुंटलवार,काॅ.मिलींद रामटेके यांचे नेत्रुत्वात शेकडो युवक आंदोलनात सहभागी झालेत.काॅ.अनिल हेपट यांनी इशारा दिला की कंपनीने तात्काळ आमची मागणी पुर्ण करावी अन्यथा आंदोलन भाकप स्टाईलने उग्र केल्या जाईल ज्याची जबाबदारी कंपनीची राहील.

Continue Reading

Previous: इयत्ता १ली पासून हिंदी सक्तीची करण्याचा निर्णय रद्द करा व मराठी भाषा व मराठी शाळा मजबूत करा..
Next: आंबेडकर जयंती रॅलीत बाटली हल्ला: जवानाच्या पत्नीला दुखापत, आरोपी अद्याप मोकाट!

Related Stories

ChatGPT Image Sep 4, 2026, 03_01_27 PM_11zon
  • वणी
  • Happy Birthday

दिगंबर गोहोकार यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

NewWaniDiary 04/09/2026
ChatGPT Image Sep 1, 2026, 05_25_56 PM_11zon
  • वणी

संजय खाडेंनी लावून धरला प्रश्न; वणी–उकणी बससेवा अखेर सुरू

NewWaniDiary 01/09/2026
ChatGPT Image Aug 27, 2026, 03_28_47 PM_11zon
  • वणी

जम्मू खान यांचा सेवाभावी उपक्रम; ४१ गरजू विद्यार्थ्यांना नवीन सायकलींचे वाटप

NewWaniDiary 27/08/2026
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.