Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • वणी
  • मुकुटबन येथे: RCCPL (MP Birla) सिमेंट कंपनीतील कामगारांचे कामबंद आंदोलन
  • वणी

मुकुटबन येथे: RCCPL (MP Birla) सिमेंट कंपनीतील कामगारांचे कामबंद आंदोलन

NewWaniDiary 06/11/2025

वणी – मुकुटबन येथे RCCPL MP Birla सिमेंट कंपनीतील कामगारांच्या विविध प्रलंबित समस्यांबाबत योग्य तो निर्णय न घेणाऱ्या कंपनी प्रशासनाविरोधात आज 6 नोव्हेंबर 2025 रोजी पहाटे पाच वाजेपासून कामगारांकडून कामबंद आंदोलन सुरू करण्यात आले.

या आंदोलनाचे नेतृत्व कंपनीत स्थापन असलेल्या जनरल इंडस्ट्रीज कामगार युनियन (आयटक) चे अध्यक्ष तथा वणी विधानसभा क्षेत्रातील प्रखर व लढाऊ नेतृत्व कॉ. अनिल हेपट यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे. कामगारांनी या आंदोलनाला १००% प्रतिसाद देत एकजूट दाखवली.

कामगारांनी कंपनी प्रशासनाला दिलेल्या अल्टिमेटममध्ये प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे—

  • किमान वेतन कायद्यानुसार योग्य वेतन अंमलात आणावे
  • कामगार संहितेनुसार कामाचे तास निश्चित करावेत
  • कार्यस्थळावरील वातावरण, सुरक्षा आणि सुविधा सुधाराव्यात
  • तसेच इतर काही प्रलंबित मागण्यांचा तातडीने विचार करावा

आंदोलनाचे नेतृत्व कॉ. अनिल हेपट यांच्यासह पुढील कार्यकर्त्यांच्या सहभागातून होत आहे—
अनिल घाटे, मोरेश्वर कुंटलवार, दिनेश शिटलवार, पंढरी नांदेकर, प्रविण कुळेकर, अनिल मोंडे, महादेव मेश्राम, कवडु केळझरकर, रोषण चामाटे, कलीम शेख, निरज खैरकर, अक्षय पुल्लीवार आदी.

कामगारांच्या न्याय्य मागण्यांचा सकारात्मक तोडगा काढण्यासाठी कंपनी प्रशासनाने तातडीने पुढाकार घ्यावा, अशी सर्वांची एकमुखी मागणी आहे.

Continue Reading

Previous: लालगुड्यात भीषण अपघातात ट्रक चालक फरार; अपघाताला सहा दिवस उलटूनही तपास ठप्प
Next: आरक्षित प्रभागांतील उमेदवारीवर मतदारांमध्ये विविध प्रतिक्रिया

Related Stories

ChatGPT Image Jul 5, 2026, 06_57_25 PM_11zon
  • वणी

निर्गुडा नदी पुलावरील सुमारे २० फूट कठडे तुटले; मोठ्या अपघाताची भीती, तातडीने दुरुस्तीची नागरिकांची मागणी

NewWaniDiary 05/07/2026
ChatGPT Image Jul 2, 2026, 03_43_04 PM_11zon
  • वणी

उकणी खंड-1 प्रकल्पग्रस्तांच्या साखळी उपोषणाला संजय खाडे यांची भेट; न्याय मिळेपर्यंत शेतकऱ्यांच्या पाठीशी राहण्याची ग्वाही

NewWaniDiary 02/07/2026
SAVE_20260628_213423_11zon
  • वणी

दामले फैल सार्वजनिक शौचालयाची दयनीय अवस्था; नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

NewWaniDiary 28/06/2026
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.