Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • वणी
  • लालगुड्यात भीषण अपघातात ट्रक चालक फरार; अपघाताला सहा दिवस उलटूनही तपास ठप्प
  • वणी

लालगुड्यात भीषण अपघातात ट्रक चालक फरार; अपघाताला सहा दिवस उलटूनही तपास ठप्प

NewWaniDiary 06/11/2025

वणी (प्रतिनिधी): घुग्घुस रोडवरील लालगुडा जवळील महामार्गावर दिनांक 31 ऑक्टोबर रोजी सकाळी झालेल्या भीषण अपघातात एका कुटुंबातील पाच निरागस व्यक्तींचा मृत्यू झाल्याची दुःखद घटना घडली. अचानक झालेल्या या धडकेत भीमनगर, वणी येथील संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाले असून शहरात शोककळा पसरली आहे.

सुट्टीच्या दिवशी रियाज शेख (वय 55) हे आपल्या मुलीस कार चालवायला शिकवण्यासाठी बाहेर गेले होते. त्यावेळी स्कोडा कार (क्रमांक O1AH 5700) ला धडक देणारा हायवा ट्रक (क्रमांक MH 40 AK 0358, ‘जोया ट्रान्सपोर्ट’ लिहिलेले) असून जोरदार धडक दिली. धडक एवढी भीषण होती की कारचा एकबाजू भाग पूर्णतः क्षतिग्रस्त झाला आणि या अपघाताने कारमधील सर्व पाच जणांचा मृत्यू झाला.

अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळावरून फरार झाला. असे नातेवाईकांकडून सांगण्यात आले. घटनेला सहा दिवस उलटूनही ट्रक चालक व ट्रक मालक यांची संपूर्ण माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे मृतकांच्या कुटुंबीयांमध्ये तसेच स्थानिक नागरिकांत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

या प्रकरणी पोलीस प्रशासनाने तातडीने संबंधित चालक व ट्रक मालकाविरुद्ध कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी परिसरातून होत आहे.

Continue Reading

Previous: प्रभाग क्रमांक ५ मध्ये उमेदवारांच्या नावांवर वेगाने चर्चा; मतदारांचे लक्ष कार्यक्षम नेतृत्वावर
Next: मुकुटबन येथे: RCCPL (MP Birla) सिमेंट कंपनीतील कामगारांचे कामबंद आंदोलन

Related Stories

ChatGPT Image Sep 4, 2026, 03_01_27 PM_11zon
  • वणी
  • Happy Birthday

दिगंबर गोहोकार यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

NewWaniDiary 04/09/2026
ChatGPT Image Sep 1, 2026, 05_25_56 PM_11zon
  • वणी

संजय खाडेंनी लावून धरला प्रश्न; वणी–उकणी बससेवा अखेर सुरू

NewWaniDiary 01/09/2026
ChatGPT Image Aug 27, 2026, 03_28_47 PM_11zon
  • वणी

जम्मू खान यांचा सेवाभावी उपक्रम; ४१ गरजू विद्यार्थ्यांना नवीन सायकलींचे वाटप

NewWaniDiary 27/08/2026
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.