
वणी (प्रतिनिधी): आगामी वणी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात नव्या चेहऱ्यांची चर्चा रंगू लागली आहे. अनेक जण निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी करत असून सोशल मीडियावर यासंदर्भातील हालचालींना वेग आला आहे.
मात्र शहरातील मतदारवर्गात अशी मागणी जोर धरत आहे की, उमेदवारांची निवड करताना त्यांच्या सामाजिक कार्यातील सहभाग, चारित्र्य आणि वार्डातील विकासासाठी केलेल्या प्रत्यक्ष कामांचा गंभीरपणे विचार करण्यात यावा.
दरम्यान, शहरातील काही व्यक्ती ज्यांचा संबंध वरली मटक्याठिकाणी काम, इतर अवैध धंदेत डागीले-डुगिले प्रकार तसेच समाजाच्या भावना दुखावणाऱ्या घटनांशी संबंधित काही व्यक्ती आता नगरसेवक होण्याची इच्छा व्यक्त करत असल्याने नागरिकांमध्ये आणि समाजात नाराजीचे वातावरण आहे.
मागील निवडणुकीत भाजपाने बहुसंख्य नगरसेवक निवडून आणत सत्ता कायम राखली होती. मात्र काही लोकप्रतिनिधींच्या गैरवर्तनामुळे आणि विशेषतः दलित वस्त्यांतील विकासकामे रखडल्याने नागरिकांमध्ये असंतोष वाढला आहे. त्यामुळे काही जुन्या नगरसेवकांना पुन्हा उमेदवारी मिळाल्यास भाजपाला फटका बसू शकतो, अशी चर्चा शहरात सुरू आहे.
आता सर्वांचे लक्ष या दिशेने लागले आहे की, सर्व पक्ष मतदारवर्गाच्या अपेक्षेनुसार प्रामाणिक, स्वच्छ प्रतिमेचे आणि विकासाभिमुख उमेदवार पुढे आणतील का?

