
वणी(प्रतिनिधी) – शहरातील मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्यासाठी नगर परिषदेकडून मोहीम सुरू करण्यात आली आहे. मनसेचे शहराध्यक्ष अंकुश बोढे यांनी नुकतेच “ढोरकी आंदोलन” करत २० ते २५ जनावरे नगर परिषदेत सोडली होती. त्यानंतर तीन दिवस मध्यरात्री विशेष मोहीम राबविण्यात आली.
नगर परिषदेने नागरिकांना आवाहन केले आहे की, आपल्या जनावरांना मोकाट न सोडता सांभाळ करावा. पकडलेली जनावरे कोंडवाड्यात टाकून गौरक्षण संस्थेकडे सुपूर्द करण्यात येणार आहेत.