
वणी येथे: न्यायसुविधांच्या विस्ताराच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकत, दिवाणी न्यायालय (वरिष्ठ स्तर) च्या उद्घाटन तसेच नवीन न्यायालयीन इमारतीच्या कोनशिला समारंभाचे आयोजन रविवार, दिनांक १५ जून २०२५ रोजी सकाळी १०.३० वाजता करण्यात आले आहे.
या भव्य समारंभाचे उद्घाटन उच्च न्यायालय, मुंबई येथील माननीय न्यायमूर्ती श्री. नितीन वा. सांबरे यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे. समारंभाच्या मुख्य अतिथी म्हणून माननीय न्यायमूर्ती श्रीमती वृषाली वि. जोशी (उच्च न्यायालय, मुंबई) या उपस्थित राहणार असून, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. नागेश वि. न्हावकर, यवतमाळ राहणार आहेत.
हा कार्यक्रम शेतकरी मंदिर, वणी येथे होणार आहे.
या ऐतिहासिक प्रसंगी वणी शहरासह संपूर्ण जिल्ह्यातील न्यायप्रेमींनी, वकिलांनी, न्यायालयीन सेवेत कार्यरत अधिकारी-कर्मचाऱ्यांनी तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर, वणी – श्री. पद्माकर एस. जोंधळे आणि वणी बार असोशिएशनचे अध्यक्ष अॅड. विरेंद्र एम. महाजन यांनी आवाहन केले आहे.
