Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • वणी
  • वणी येथे: दिवाणी न्यायालय (वरिष्ठ स्तर) चे उद्घाटन व नवीन न्यायालयीन इमारतीच्या कोनशिलेचा भव्य समारंभ – १५ जून रोजी
  • वणी

वणी येथे: दिवाणी न्यायालय (वरिष्ठ स्तर) चे उद्घाटन व नवीन न्यायालयीन इमारतीच्या कोनशिलेचा भव्य समारंभ – १५ जून रोजी

NewWaniDiary 14/06/2025

वणी येथे: न्यायसुविधांच्या विस्ताराच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकत, दिवाणी न्यायालय (वरिष्ठ स्तर) च्या उद्घाटन तसेच नवीन न्यायालयीन इमारतीच्या कोनशिला समारंभाचे आयोजन रविवार, दिनांक १५ जून २०२५ रोजी सकाळी १०.३० वाजता करण्यात आले आहे.

या भव्य समारंभाचे उद्घाटन उच्च न्यायालय, मुंबई येथील माननीय न्यायमूर्ती श्री. नितीन वा. सांबरे यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे. समारंभाच्या मुख्य अतिथी म्हणून माननीय न्यायमूर्ती श्रीमती वृषाली वि. जोशी (उच्च न्यायालय, मुंबई) या उपस्थित राहणार असून, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. नागेश वि. न्हावकर, यवतमाळ राहणार आहेत.

हा कार्यक्रम शेतकरी मंदिर, वणी येथे होणार आहे.

या ऐतिहासिक प्रसंगी वणी शहरासह संपूर्ण जिल्ह्यातील न्यायप्रेमींनी, वकिलांनी, न्यायालयीन सेवेत कार्यरत अधिकारी-कर्मचाऱ्यांनी तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर, वणी – श्री. पद्माकर एस. जोंधळे आणि वणी बार असोशिएशनचे अध्यक्ष अॅड. विरेंद्र एम. महाजन यांनी आवाहन केले आहे.

Continue Reading

Previous: शेतकरी, शेतमजूर व दिव्यांगांसाठी सुरू असलेल्या बच्चु कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाला संभाजी ब्रिगेडचा जाहीर पाठिंबा!
Next: देश अपघातांचा, सरकार घातपाताचं आणि राजकारण आरोप-प्रत्यारोपाचं – सामाजिक चिंतनात्मक लेखातून प्रखर भाष्य

Related Stories

SAVE_20261019_174622
  • वणी

१३ वर्षांपासून फरार आरोपी उत्तर प्रदेशातून अटकेत; शिरपूर पोलिसांची कारवाई

NewWaniDiary 19/10/2026
SAVE_20261019_125459
  • वणी

‘भाऊचा दांडिया’ उत्सवात काँग्रेस नेते संजय खाडे यांचा सत्कार

NewWaniDiary 19/10/2026
ChatGPT Image Oct 19, 2026, 09_57_08 AM_11zon
  • वणी

चिखलगावात आदिशक्ती दुर्गोत्सव मंडळाची भुतिया गुफा आकर्षणाचे केंद्र

NewWaniDiary 19/10/2026
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.