Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • वणी
  • एकता नगर ते तहसील कार्यालयकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी
  • वणी

एकता नगर ते तहसील कार्यालयकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी

NewWaniDiary 05/09/2025

वणी (प्रतिनिधी) : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष अंकुश बोढे यांनी दि. ४ सप्टेंबर रोजी नगर परिषद वणीचे मुख्याधिकारी यांना निवेदन देऊन एकता नगर ते तहसील कार्यालयकडे जाणाऱ्या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे.

या मार्गावर उपविभागीय अधिकारी यांचे निवासस्थान, न्यायालय, तहसील कार्यालय व बसस्थानक असल्याने नागरिक, विद्यार्थी व प्रवासी मोठ्या प्रमाणावर ये-जा करतात. मात्र रस्त्यावर पडलेल्या मोठ्या खड्ड्यांमुळे वाहतुकीत अडथळे निर्माण होत असून अपघाताचा धोका वाढला आहे. विशेषतः शाळकरी विद्यार्थ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.

याबाबत मनसे शहराध्यक्ष बोढे यांनी प्रशासनाचे लक्ष वेधून घेत तातडीने दुरुस्तीची मागणी केली. समस्या तातडीने सोडवली नाही तर नागरिकांच्या सुरक्षेसाठी गंभीर परिस्थिती निर्माण होईल, असा इशाराही या निवेदनातून देण्यात आला आहे.

Continue Reading

Previous: इंसानियत का पैग़ाम – आओ रक्तदान करें!
Next: युवा उद्योजक श्री साई ऑटोमोबाईल व सर्व्हिस सेंटर चे संचालक; योगेश खंडाळकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.!

Related Stories

ChatGPT Image Sep 4, 2026, 03_01_27 PM_11zon
  • वणी
  • Happy Birthday

दिगंबर गोहोकार यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

NewWaniDiary 04/09/2026
ChatGPT Image Sep 1, 2026, 05_25_56 PM_11zon
  • वणी

संजय खाडेंनी लावून धरला प्रश्न; वणी–उकणी बससेवा अखेर सुरू

NewWaniDiary 01/09/2026
ChatGPT Image Aug 27, 2026, 03_28_47 PM_11zon
  • वणी

जम्मू खान यांचा सेवाभावी उपक्रम; ४१ गरजू विद्यार्थ्यांना नवीन सायकलींचे वाटप

NewWaniDiary 27/08/2026
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.