Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • वणी
  • नागरिकांचे आरोग्य धोक्यात: नदी झाली गटारगंगा, पालिकेचे दुर्लक्ष..
  • वणी

नागरिकांचे आरोग्य धोक्यात: नदी झाली गटारगंगा, पालिकेचे दुर्लक्ष..

NewWaniDiary 21/04/2025

▪️शहराच्या कॉलण्याचे व अन्य वसाहतीतील घाण पाणी निर्गुडा नदीत..

न्यू वणी डायरी : वणी शहराची जीवनवाहिनी असलेली निर्गुडा नदी सध्या अत्यंत दूषित अवस्थेत असून, नगरपालिकेच्या दुर्लक्ष आणि थेट सांडपाण्याच्या विसर्गामुळे तिची अवस्था गंभीर झाली आहे. या नदीवर शहराचा पाणीपुरवठा अवलंबून असल्याने नागरिकांच्या आरोग्यावर धोका निर्माण झाला आहे.

जलशुद्धीकरण केंद्रातील भ्रष्टाचार, लोकप्रतिनिधींचा अभाव आणि अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार यामुळे परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. २०१६ मध्ये काही स्वच्छता मोहिमा राबवण्यात आल्या, पण योग्य नियोजनाअभावी त्या अपयशी ठरल्या.

शहरातील सिंधी कॉलनी, पोलीस कॉटर लाईन, तेली फैल, साधनकर वाडी,राम शेवालकर परिसर आदी भागातील सांडपाणी थेट नदीत सोडले जात आहे, तसेच दामले फैल  शौचालय गटार व्यवस्था देखील निकृष्ट असून कोणतीही उपाययोजना केलेली नाही.न.प.जलशुद्धीकरण केंद्राच्या व दलित वस्त्यांची शौचालया नावावर खोटे बिल काढण्याचे काम सुरु आहे.  नदीच्या पात्रात साचलेल्या घाण पाण्यामुळे दुर्गंधी पसरली असून नागरिक त्रस्त आहेत.

निवेदने देऊनही कधी त्याठिकाणी न.प. अधिकारी जाऊन पाहणी केली नाही. उपाय न झाल्याने नागरिकांत नाराजी आहे.  नदी बचाव कार्यकर्त्यांनी जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे.

Continue Reading

Previous: वणी येथे:बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे आयोजन..
Next: दामले फैलच्या नागरिकांची पिण्याच्या पाणीसाठी ग्रामीण परिसरात धावफळ..

Related Stories

ChatGPT Image Sep 4, 2026, 03_01_27 PM_11zon
  • वणी
  • Happy Birthday

दिगंबर गोहोकार यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

NewWaniDiary 04/09/2026
ChatGPT Image Sep 1, 2026, 05_25_56 PM_11zon
  • वणी

संजय खाडेंनी लावून धरला प्रश्न; वणी–उकणी बससेवा अखेर सुरू

NewWaniDiary 01/09/2026
ChatGPT Image Aug 27, 2026, 03_28_47 PM_11zon
  • वणी

जम्मू खान यांचा सेवाभावी उपक्रम; ४१ गरजू विद्यार्थ्यांना नवीन सायकलींचे वाटप

NewWaniDiary 27/08/2026
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.