Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • वणी
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती – वणी शहरातील मोट्या उस्तवात साजरी..
  • वणी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती – वणी शहरातील मोट्या उस्तवात साजरी..

NewWaniDiary 15/04/2025

▪️ समाजिक ग्रुपच्या वतीने आगळीवेगळी अभिवादन संकल्पना..

वणी : शहरात १४ एप्रिल रोजी द ग्रेट पिपल्स ग्रुप यांच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ सकाळी ७ वाजता आगळीवेगळी अभिवादन संकल्पना राबवण्यात आली. पारंपरिक पुष्पहाराऐवजी, पुस्तके भेट देऊन बाबासाहेबांना अभिवादन करण्याचे आवाहन करण्यात आले होते. या उपक्रमात प्रशासन अधिकारी, सामाजिक संस्था व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले.

पुतळा सजावट समितीतर्फे आंबेडकरी समाजबांधवांसाठी अल्पोपहार (चहा) चे आयोजन करण्यात आले. महाबोधी महाविहार बुद्धगया मुक्ती आंदोलना करीता भारतीय बौद्ध महासभा तर्फे स्वाक्षरी अभियान सकाळपासून रात्री ११ वाजेपर्यंत राबविण्यात आली. बस स्टॅन्ड समोर दुपारी १२ वाजता भीम टायगर सेनेचे जिल्हाध्यक्ष योगेश भाऊ रायपुरे यांनी धम्म भोजन आयोजित केले. खाती चौक येथील सायंकाळी ६ वाजता इजहार भाई मित्र परिवार तर्फे मिरवणूक रॅलीतील समाजबांधवांना बिस्कीट वाटप करण्यात आले.

विविध वॉर्डांतून आलेल्या रॅली एकत्र येऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील भीम जनसागराचे दृश्य निर्माण झाले. समाजबांधव उपस्थितांनी बाबासाहेबांच्या पुतळ्याला हार अर्पण व अभिवादन करून सामूहिक वंदना घेतली.

कार्यक्रमासाठी प्रशासन अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे, ठाणेदार गोपाल उंबरकर व पोलीस कर्मचारी पूर्ण वेळ बंदोबस्तात होते. शेवटी आंबेडकरी समाजबांधवांकडून पोलीस प्रशासनाचे आभार मानत कार्यक्रमाची सांगता झाली.

Continue Reading

Previous: डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या आयोजनाच्या अनुषंगाने बैठक वणी पोलीस स्टेशन येथे पार पडली..
Next: सनराईज क्रिकेट अकॅडमी – वणी तालुक्यातील विशेष प्रशिक्षण शिबीर..

Related Stories

ChatGPT Image Jul 5, 2026, 06_57_25 PM_11zon
  • वणी

निर्गुडा नदी पुलावरील सुमारे २० फूट कठडे तुटले; मोठ्या अपघाताची भीती, तातडीने दुरुस्तीची नागरिकांची मागणी

NewWaniDiary 05/07/2026
ChatGPT Image Jul 2, 2026, 03_43_04 PM_11zon
  • वणी

उकणी खंड-1 प्रकल्पग्रस्तांच्या साखळी उपोषणाला संजय खाडे यांची भेट; न्याय मिळेपर्यंत शेतकऱ्यांच्या पाठीशी राहण्याची ग्वाही

NewWaniDiary 02/07/2026
SAVE_20260628_213423_11zon
  • वणी

दामले फैल सार्वजनिक शौचालयाची दयनीय अवस्था; नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

NewWaniDiary 28/06/2026
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.