
वणी (प्रतिनिधी): वणी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक–२०२५ मध्ये थेट नगराध्यक्ष पदासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, संभाजी ब्रिगेड, भीम आर्मी आणि मित्रपक्षांच्या आघाडीने डॉ. संचिता विजयराव नगराळे यांना अधिकृत उमेदवार म्हणून घोषित केले आहे.

प्रभाग क्र. ६ सह संपूर्ण शहरातून त्यांना मिळणारा उत्स्फूर्त पाठिंबा लक्षवेधी ठरत आहे. समाजकारणातील त्यांचा अनुभव पाहता सुजाण मतदारांमध्ये त्यांच्या नेतृत्वाविषयी विश्वास आणि सहानुभूती वाढत आहे.
डॉ. संचिता नगराळे यांच्या प्रचारसभांना, पदयात्रांना आणि घरदारी भेटीगाठींना नागरिकांकडून मिळणारा उस्फुर्त प्रतिसाद विशेष उल्लेखनीय आहे. विशेषतः महिला मतदार आणि तरुणांमध्ये त्यांच्या नेतृत्वाची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे.

आघाडीतील सर्व पक्षांची एकजूट, प्रमुख नेत्यांचा सक्रिय सहभाग आणि डॉ. नगराळे यांचे स्वच्छ, सेवाभावी व जनसामान्यांशी निगडित व्यक्तिमत्त्व, यामुळे प्रभाग क्र. ६ मध्ये त्यांच्याबाबत सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे.

मतदारांकडून वाढत चाललेल्या जनसमर्थनाच्या आधारे, डॉ. संचिता विजयराव नगराळे वणी नगरपरिषदेची विजयश्री नक्कीच खेचून आणतील, असा विश्वास प्रभागातील जबाबदार नागरिकांनी व्यक्त केला आहे.
