Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • वणी
  • वणी पब्लिक स्कूल व हिंदी विद्यालयात ८०० विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी..
  • वणी

वणी पब्लिक स्कूल व हिंदी विद्यालयात ८०० विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी..

NewWaniDiary 02/08/2025

▪️नेत्रोदय आय हॉस्पिटलतर्फे भव्य नेत्र शिबिर संपन्न..

वणी (प्रतिनिधी) – श्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेच्या वतीने संचालित वणी पब्लिक स्कूल व राजर्षी शाहू महाराज हिंदी विद्यालयात नेत्रोदय आय हॉस्पिटल यांच्या सहकार्याने भव्य नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात दोन्ही शाळेतील विद्यार्थ्यांसह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पालकांचा उत्स्फूर्त सहभाग होता.

शिबिराचे उद्घाटन डॉ. स्वप्नील गोहोकार व डॉ. कोमल गोहोकार यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव ओमप्रकाशजी चचडा होते. या शिबिराचे नियोजन वणी पब्लिक स्कूलचे प्राचार्य राकेश देशपांडे व हिंदी विद्यालयाचे मुख्याध्यापक अभय पारखी यांनी केले.

“आरोग्यम धनसंपदा” या उपक्रमांतर्गत आयोजित या शिबिरात सुमारे ८०० विद्यार्थ्यांची आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे नेत्र तपासणी करण्यात आली. काही विद्यार्थ्यांमध्ये डोळ्यांचे त्रास आढळून आले. यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. गोहोकार यांनी मोबाईलचे दुष्परिणाम आणि मैदानी खेळाचे महत्त्व अधोरेखित केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक गंगारेड्डी बोडखे यांनी केले. सूत्रसंचालन प्रणोती खडसे व अनिता गौरकार यांनी तर आभार प्रदर्शन प्रभुदास नगराळे व उलमाले यांनी केले.

शिबिराच्या यशस्वीतेसाठी प्रतिश लखमापुरे, तुषार घाणे, भाग्यश्री लांडे, , राजेंद्र देवतळे, सुनिल गेडाम, हरिदास वासेकर, हरिदास बोढाले, जितेंद्र डगावकर यांच्यासह आदींनी मोलाचे सहकार्य केले. कार्यक्रमाची सांगता सर्व विद्यार्थ्यांना आय ड्रॉप वाटपाने करण्यात आली.

Continue Reading

Previous: खड्ड्यांमुळे रुग्णालयात जाणाऱ्या रुग्णांचे हाल – वणीतील नागरीकांची नगर परिषदेकडे विनंती
Next: भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी ऍड. कुणाल विजय चोरडिया यांची निवड झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा!

Related Stories

SAVE_20260226_131159_11zon
  • वणी
  • घोन्सा

आदर्श हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, घोन्सा येथे माजी विद्यार्थी स्नेहमिलन उत्साहात

NewWaniDiary 26/02/2026
SAVE_20260225_203542_11zon
  • वणी

वनाधिकार कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणी साठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व किसान सभेने केले आंदोलन

NewWaniDiary 25/02/2026
SAVE_20260223_232242-1024x678.jpg
  • महाराष्ट्र
  • वणी

रायगड किल्ला येथे स्वच्छता अभियान; शिवसैनिकांकडून दोन महापुरुषांना मानवंदना

NewWaniDiary 23/02/2026
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.