Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • महाराष्ट्र
  • सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी सज्ज होतोय महाराष्ट्र!
  • महाराष्ट्र
  • मुंबई

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी सज्ज होतोय महाराष्ट्र!

NewWaniDiary 17/01/2025

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेत ‘कुंभमेळा’ आढावा बैठक दि.17 जानेवारी रोजी सह्याद्री अतिथिगृह, मुंबई येथे पार पडली..

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्ष 2027 मध्ये ऑगस्ट ते नोव्हेंबर या कालावधीत त्र्यंबकेश्वर (नाशिक) येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासंदर्भात आढावा घेतला. यासोबतच पायाभूत सुविधा तसेच इतर अनुषंगिक विकास कामांसंदर्भात महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला पुढील निर्देश दिले.

✅नाशिकजवळ महाकुंभ उभारून देशातील धार्मिक परंपरा, मंदिरे, तीर्थक्षेत्रे आणि सांस्कृतिक वारसा यांचे दर्शन घडवण्यासाठी भव्य कन्व्हेंशन सेंटर उभारणे
✅नाशिकला जागतिक पटलावर आणण्यासाठी आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी कुंभमेळ्याचे प्रभावी ब्रँडिंग करणे
✅भाविकांसाठी वाहतूक व्यवस्था व गर्दी नियोजन सुटसुटीत ठेवण्यासाठी उपाययोजना कराव्यात
✅साधुग्रामसाठी लागणाऱ्या जमिनीचे संपादन करावे
✅या ठिकाणी नगररचना परियोजन करून हस्तांतरणीय विकास हक्क स्थापित करून ते नगरपालिकेकडे हस्तांतरीत करावे
✅ज्या ठिकाणी अतिक्रमणे झाली आहेत, ती तात्काळ हटवण्याचे आदेश
✅देशविदेशातून येणाऱ्या पर्यटक व भाविकांसाठी नाशिक येथे 8-10 हेलिपॅड्स तयार करावेत
✅समृद्धी महामार्गाद्वारे नाशिकला जोडणाऱ्या मार्गांचे काम गतीने पूर्ण करावे आणि इगतपुरी ते नाशिक हा मार्ग अधिक प्रशस्त करावा
✅जे मार्ग 2027 पर्यंत बांधणे शक्य आहे, असेच बांधकाम हाती घेण्यात यावे
✅गोदावरी नदीसह सर्व उपनद्यांचे शुद्धीकरण करणे

बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री गिरीश महाजन आणि इतर वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते.

दि.17 जानेवारी 2025 रोजी, महाराष्ट्र मुख्यमंत्री कार्यालयाच्या अधिकृत WhatsApp चॅनेलवरून ही माहिती मिळाली आहे.

Continue Reading

Previous: कुजलेल्या अवस्थेत सापडलेल्या वाघाच्या प्रकरणात चौघा आरोपींना अटक
Next: आशा व गटप्रवर्तक संघटना ( सिटू ) चे पहिले तालुका अधिवेशन वणी येथे संपन्न

Related Stories

SAVE_20260223_232242-1024x678.jpg
  • महाराष्ट्र
  • वणी

रायगड किल्ला येथे स्वच्छता अभियान; शिवसैनिकांकडून दोन महापुरुषांना मानवंदना

NewWaniDiary 23/02/2026
SAVE_20251216_200159
  • मुंबई
  • वणी

माजी आमदार विश्वास नांदेकर यांची लीलावती रुग्णालयात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट

NewWaniDiary 17/12/2025
SAVE_20250816_200833
  • महाराष्ट्र

माहीममध्ये भूखंड वाचवण्यासाठी झेंडावंदन; नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती

NewWaniDiary 16/08/2025
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.