Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • वणी
  • छत्रपती शिवाजी महाराज चौक, वणी येथे दुकानदारावर जीवघेणा हल्ला..
  • वणी

छत्रपती शिवाजी महाराज चौक, वणी येथे दुकानदारावर जीवघेणा हल्ला..

NewWaniDiary 20/05/2025

वणी : दि. 18 मे रोजी सायंकाळी 6:15 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक, वणी येथे एक गंभीर घटना घडली. साजिद शेख या युवकावर त्याच्या लहानशा पानटपरीमध्ये काही वेक्ती दुकानात येवून बेदम मारहाण केली, जीवे मारण्याची धमकी दिली आणि दुकानाची नासधूस केली. या हल्ल्याचा उद्देश त्याची हत्या करण्याचा होता, असा आरोप साजिद शेख ने केला आहे.

साजिद शेख याच्यावर यापूर्वीही दोनदा हल्ला झाला असून ही तिसरी वेळ आहे. अशा घटनांमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पीडित युवकाने सोशल मीडियाच्या माध्यमातून मदतीचे आवाहन केले असून प्रशासनाकडून न्याय मिळावा, अशी मागणी केली आहे.

हल्लेखोर संबंधित वेक्ती त्या परिसरात दहशत निर्माण करत असून, सामान्य नागरिक दुकानदार यांचे जीवन असुरक्षित झाले आहे. दरवेळी झालेल्या हल्ल्यांनंतर कारवाईच्या नावाखाली पीडितालाच दोषी ठरवण्याचा प्रकार होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन पोलीस प्रशासनाने तात्काळ कडक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांमध्ये जोर धरत आहे. यासोबतच व्यापारी संघटनांनी या घटनेची नोंद घेऊन पीडितास मदत करावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.

Continue Reading

Previous: “प्रेरणेचे आधार उध्वस्त होत आहेत – रक्षण कोण करणार?”
Next: वणी बस स्थानकात पाकीट चोरीची घटना – पोलिसांनी लक्ष देण्याची गरज..

Related Stories

ChatGPT Image Jul 5, 2026, 06_57_25 PM_11zon
  • वणी

निर्गुडा नदी पुलावरील सुमारे २० फूट कठडे तुटले; मोठ्या अपघाताची भीती, तातडीने दुरुस्तीची नागरिकांची मागणी

NewWaniDiary 05/07/2026
ChatGPT Image Jul 2, 2026, 03_43_04 PM_11zon
  • वणी

उकणी खंड-1 प्रकल्पग्रस्तांच्या साखळी उपोषणाला संजय खाडे यांची भेट; न्याय मिळेपर्यंत शेतकऱ्यांच्या पाठीशी राहण्याची ग्वाही

NewWaniDiary 02/07/2026
SAVE_20260628_213423_11zon
  • वणी

दामले फैल सार्वजनिक शौचालयाची दयनीय अवस्था; नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

NewWaniDiary 28/06/2026
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.