Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • वणी
  • वणी बस स्थानकात पाकीट चोरीची घटना – पोलिसांनी लक्ष देण्याची गरज..
  • वणी

वणी बस स्थानकात पाकीट चोरीची घटना – पोलिसांनी लक्ष देण्याची गरज..

NewWaniDiary 20/05/2025

वणी : आज दि. 20 मे रोजी, वणी बस स्थानकावर सामाजिक कार्यकर्ते: नारायण गोडे यांच्या पाकीट चोरीची घटना सायंकाळी 4:30 वाजता घडली. गोडे हे वणीहून मुकुटबनकडे जाणाऱ्या एस.टी. बसने प्रवास करत होते. बस अर्ध्या रस्त्यावर पोहोचल्यावर कंडक्टरने तिकिट मागितल्यावर त्यांनी पाकीट हरवल्याचे लक्षात आले.

गोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिटात अंदाजे ₹4,300 होते. त्यांनी तत्काळ पोलिसांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला, परंतु कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यांच्या शेजारी बसलेल्या एका प्रवाशाने त्यांच्या मदतीस येत तिकिट काढून दिले.

सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू असल्यामुळे वणी बस स्थानक परिसरात प्रवाशांची वर्दळ वाढली असून, त्याच बरोबर चोरीच्या घटनाही वाढल्या आहेत. ही घटना त्याचेच उदाहरण आहे.

नागरिकांनी अधिक सतर्क राहावे व पोलीस प्रशासनाने बस स्थानक परिसरात गस्त वाढवून चोरांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

Continue Reading

Previous: छत्रपती शिवाजी महाराज चौक, वणी येथे दुकानदारावर जीवघेणा हल्ला..
Next: समाजकारणी, कामगार नेते; संजय खाडे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम..

Related Stories

ChatGPT Image Sep 1, 2026, 05_25_56 PM_11zon
  • वणी

संजय खाडेंनी लावून धरला प्रश्न; वणी–उकणी बससेवा अखेर सुरू

NewWaniDiary 01/09/2026
ChatGPT Image Aug 27, 2026, 03_28_47 PM_11zon
  • वणी

जम्मू खान यांचा सेवाभावी उपक्रम; ४१ गरजू विद्यार्थ्यांना नवीन सायकलींचे वाटप

NewWaniDiary 27/08/2026
ChatGPT Image Aug 25, 2026, 01_40_53 PM_11zon
  • वणी

प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जन्मदिनानिमित्त वणीत भव्य रक्तदान शिबिर

NewWaniDiary 25/08/2026
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.