
दि. 14 फेब्रुवारी रोजी रात्री 10.30 ते 11 च्या सुमारास मारेगाव तालुक्यात अचानक जोराचा धक्का जाणवला. घाबरलेले नागरिक घराबाहेर पडले, काहींनी रात्रभर जागून काढली.
चर्चा तालुक्यातील पीसगाव, कुंभा, सिंधी मांगरुळ, चिंचाळा या गावांमध्ये घडली. सोशल मीडियातून सध्या नागरिकांमध्ये याविषयी चर्चा सुरू आहे.
सुरुवातीला हा धक्का ब्लास्टिंगचा असल्याचा संशय घेतला गेला, पण चौकशीत असे काही आढळले नाही.
हा सौम्य भूकंपाचा धक्का असावा, असे समजले असले तरी प्रशासकीय पुष्टी झालेली नाही. तहसीलदार उत्तम निलावाड यांनी घटनास्थळी भेट देऊन चौकशी केली आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती कळवली.

