
वणी : १६ मे रोजी वणी-यवतमाळ महामार्ग क्रमांक ७ वरील पुनवट गावाजवळ गुरुवारी सकाळी ९:३० च्या सुमारास टाटा एस मालवाहू वाहनाला अचानक आग लागून वाहन जळून खाक झाले. शॉर्ट सर्किटमुळे ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
एमएच ३४ एबी ७९०२ क्रमांकाच्या या वाहनाचे मालक धनराज भोगले हा रा. शिवणी (नवीन), वणी येथे आपल्या मुलीच्या लग्नासाठी हुंड्याच्या वस्तू घेऊन निघाले होते. मात्र, नायगाव-पुनवट दरम्यान अचानक वाहनाला आग लागली. सतर्कतेमुळे चालक संजू सिंगे यांनी हुंड्याच्या वस्तू सुरक्षित बाहेर काढल्या, त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही.
घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले, परंतु तोपर्यंत वाहन पूर्णतः जळून खाक झाले होते. या दुर्घटनेत वाहनाचे आणि मालाचे मिळून लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.
पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला असून, अधिक तपास सुरु आहे.
