Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • वणी
  • शेतकऱ्याला माजी आमदाराची धमकी व मारहाण; पोलिसांकडे तक्रार
  • वणी

शेतकऱ्याला माजी आमदाराची धमकी व मारहाण; पोलिसांकडे तक्रार

NewWaniDiary 16/05/2025


वणी : तालुक्यातील चिखलगाव येथील शेतकरी मारोती दादाजी खुसपुरे (वय ५४) यांनी माजी आमदार संजीवरेड्डी बापुराव बोदकुरवार व त्यांच्या वाहन चालकाविरोधात शिवीगाळ, जीवे मारण्याची धमकी व मारहाणीबाबत वणी पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे.
खुसपुरे यांच्या म्हणण्यानुसार, दिनांक १४ मे २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजता ते स्वतःच्या शेताच्या सीमारेषेवर सिमेंटचे खांब लावून कंपाऊंड करत असताना माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार हे त्यांच्या वाहनासह घटनास्थळी आले. त्यांनी खुसपुरे यांना अर्वाच्य शिवीगाळ करत खांब फेकून दिले. त्यानंतर त्यांच्या वाहन चालकाने खुसपुरे यांना धक्का देत शारीरिक धक्काबुक्की केली व जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना माजी आमदारांच्या उपस्थितीत घडल्याचे खुसपुरे यांनी नमूद केले आहे.
खुसपुरे यांनी पुढे सांगितले की, “माझे व माजी आमदारांचे शेत शेजारी असून ते सतत वाद निर्माण करत आहेत.

त्यांच्या राजकीय प्रभावामुळे मला व माझ्या कुटुंबीयांना जिवीतास धोका आहे.”
तक्रारीत खुसपुरे यांनी संबंधितांवर त्वरित आणि कठोर कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Continue Reading

Previous: वणी शहरातील सायकल चोरीची घटना – पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह
Next: पुनवटजवळ मालवाहू वाहनाला आग, लाखोंचे नुकसान..

Related Stories

ChatGPT Image Sep 1, 2026, 05_25_56 PM_11zon
  • वणी

संजय खाडेंनी लावून धरला प्रश्न; वणी–उकणी बससेवा अखेर सुरू

NewWaniDiary 01/09/2026
ChatGPT Image Aug 27, 2026, 03_28_47 PM_11zon
  • वणी

जम्मू खान यांचा सेवाभावी उपक्रम; ४१ गरजू विद्यार्थ्यांना नवीन सायकलींचे वाटप

NewWaniDiary 27/08/2026
ChatGPT Image Aug 25, 2026, 01_40_53 PM_11zon
  • वणी

प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जन्मदिनानिमित्त वणीत भव्य रक्तदान शिबिर

NewWaniDiary 25/08/2026
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.