Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • वणी
  • वणी शहरात खळबळ : तरुणाचा मृतदेह पाण्यात आढळला
  • वणी

वणी शहरात खळबळ : तरुणाचा मृतदेह पाण्यात आढळला

NewWaniDiary 15/10/2025

वणी (प्रतिनिधी): आज दि. १५ ऑक्टोबर रोजी वणी-भालर रोडवरील एका निलजर कंपनीच्या जागेत पाण्यात एका तरुणाचा मृतदेह आढळल्याने शहरात एकच खळबळ उडाली. ही माहिती पसरताच मोठ्या संख्येने नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली.

वणी पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत मृतदेह बाहेर काढला. मृतदेह दोरीने हात बांधून नग्न अवस्थेत आढळला असून त्याची ओळख मनोज वानखेडे (वय ३७, रा. वाघदरा) अशी करण्यात आली आहे.

पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह वणी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. हत्या, करण्यात आली अशी चर्चा घटनास्थळी व दीपक चैपाटी परिसरात नागरिकांत सुरु असुन

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या या घटनेमुळे परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये अस्वस्थता पसरली असून, वणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

Continue Reading

Previous: मतदारयादीत घोळ; मनसेचा पालिकेवर गंभीर आरोप
Next: चार वेळा नगरसेवक राहिलेले माजी नगराध्यक्ष रायपुरे पुन्हा निवडणुकीच्या चर्चेत

Related Stories

ChatGPT Image Jul 5, 2026, 06_57_25 PM_11zon
  • वणी

निर्गुडा नदी पुलावरील सुमारे २० फूट कठडे तुटले; मोठ्या अपघाताची भीती, तातडीने दुरुस्तीची नागरिकांची मागणी

NewWaniDiary 05/07/2026
ChatGPT Image Jul 2, 2026, 03_43_04 PM_11zon
  • वणी

उकणी खंड-1 प्रकल्पग्रस्तांच्या साखळी उपोषणाला संजय खाडे यांची भेट; न्याय मिळेपर्यंत शेतकऱ्यांच्या पाठीशी राहण्याची ग्वाही

NewWaniDiary 02/07/2026
SAVE_20260628_213423_11zon
  • वणी

दामले फैल सार्वजनिक शौचालयाची दयनीय अवस्था; नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

NewWaniDiary 28/06/2026
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.