Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • वणी
  • वणी शहरातील सायकल चोरीची घटना – पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह
  • वणी

वणी शहरातील सायकल चोरीची घटना – पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह

NewWaniDiary 16/05/2025

वणी : शहरातील सम्राट अशोक नगर येथील सिद्धार्थ लोहकरे यांच्या घरून २२ एप्रिल रोजी सकाळी १० ते २३ एप्रिल सकाळी ५ वाजेच्या दरम्यान अज्ञात व्यक्तीने सायकल चोरी केली. त्यांनी २३ एप्रिल रोजी दिवसभर शहरात सायकलचा शोध घेतला, मात्र ती कुठेही सापडली नाही.

सायंकाळी ७:३० वाजता त्यांनी वणी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला. तेथे त्यांना स्टेशन डायरीमध्ये नोंद करण्याऐवजी पोलिस शिपायांना भेटण्यास सांगण्यात आले. संबंधित शिपायाने त्यांना एका संशयिताच्या घरी पाठवले. सिद्धार्थ लोहकरे जबाबदार व्यक्तीला घेऊन त्या ठिकाणी (पुकटवाडी) गेले, पण सायकल मिळाली नाही. हे पोलिसांना सांगितल्यावर त्यांनीही पुढील काही कारवाई केली नाही.

शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे असतानाही अद्याप पोलिसांनी चौकशी केली नाही.
या घटनेवरून पोलीस जबाबदारीने वागतात का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. तक्रार केवळ डायरीमध्ये नोंदवली असून, ऑनलाईन तक्रार दाखल झालेली नाही. त्यामुळे सिद्धार्थ लोहकरे यांनी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी केली आहे.

Continue Reading

Previous: न्यायमूर्ती बी. आर. गवई यांनी घेतली भारताचे ५२ वे सरन्यायाधीश म्हणून शपथ..
Next: शेतकऱ्याला माजी आमदाराची धमकी व मारहाण; पोलिसांकडे तक्रार

Related Stories

ChatGPT Image Sep 4, 2026, 09_31_16 PM_11zon
  • वणी

तेली फैलमध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्साह; आकर्षक रोषणाईने परिसर उजळला

NewWaniDiary 04/09/2026
ChatGPT Image Sep 4, 2026, 03_58_51 PM_11zon
  • वणी
  • Happy Birthday

गरजूंना मदतीचा हात पुढे करणारे विजयबाबू चोरडिया यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

NewWaniDiary 04/09/2026
ChatGPT Image Sep 4, 2026, 03_01_27 PM_11zon
  • वणी
  • Happy Birthday

दिगंबर गोहोकार यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

NewWaniDiary 04/09/2026
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.