
वणी : शहरातील स्माईल फाऊंडेशनने सामाजिक भान ठेवत ‘नवी दृष्टी’ हा मोफत नेत्रउपचार उपक्रम सुरू केला आहे. या अंतर्गत ख्यातनाम नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. अनिकेत अलोणे दर महिन्याला दोन मोफत डोळ्यांच्या शस्त्रक्रिया करतात. गरजू रुग्णांना नवदृष्टी देणाऱ्या या उपक्रमांतर्गत त्यांनी आतापर्यंत 10 पेक्षा अधिक मोफत ऑपरेशन यशस्वीरित्या पूर्ण केली आहेत.
स्माईल फाऊंडेशनचा हा उपक्रम गरजूंसाठी आशेचा किरण ठरत असून, सामाजिक सेवेसाठी एक प्रेरणादायी पाऊल ठरत आहे.
