
वणी (प्रतिनिधी): दि. २६ नोव्हेंबर संविधान दिनानिमित्त वणी येथील आंबेडकर चौकात विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पांजली अर्पण करून अभिवादन करण्यात आले. संविधान निर्मात्यांच्या महान कार्याला व योगदानाला पत्रकार बांधवांनी विनम्र श्रद्धांजली अर्पण केली.
कार्यक्रमात पत्रकार सुनील ठाकरे, सुशील अडकीने, अमोल कुमरे आणि नरेश ठाकरे यांनी सामूहिकरीत्या अभिवादन करून संविधान मूल्यांप्रती आपली निष्ठा व्यक्त केली. उपस्थित मान्यवरांनी सामाजिक समता, बंधुता आणि लोकशाही टिकवण्यासाठी प्रत्येक नागरिकाची सक्रिय भूमिका अत्यावश्यक असल्याचे आवाहन केले.
संविधान दिनानिमित्त आंबेडकर चौक परिसर देशभक्ती, संविधानप्रेम आणि लोकशाही मूल्यांच्या जागरूकतेने भारून गेला.
