
वणी : आज दि. ५ एप्रिल रोजी, मास्मो केअर हेल्थ सेंटर आणि सेव्हन स्टार फाउंडेशन यांच्या वतीने वन परिक्षेत्र विभागाच्या कार्यलय वणी येथे आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले.

या शिबिरात वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि सामान्य नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. शिबिरामध्ये पूर्ण बॉडी ॲनालिसीस, आयुर्वेदिक उपचार, योग आणि आहार यावर आधारित आरोग्य तपासणी केली गेली.

यावेळी एस.ए. कोकणे, सहायक वनसंरक्षक वणी आणि एस.एस. वीरकर, वनपरीक्षेत्र अधिकारी (प्रा.) वणी उपस्थित होते.

