Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • वणी
  • धनुष्यबाण मैदानात उतरल्याने प्रभाग १३ चे राजकारण तापले; शिवसेनेची रॅली उत्साहात
  • वणी
  • राजकीय

धनुष्यबाण मैदानात उतरल्याने प्रभाग १३ चे राजकारण तापले; शिवसेनेची रॅली उत्साहात

NewWaniDiary 29/11/2025

वणी (प्रतिनिधी): वणी नगरपरिषद निवडणुकीत २ डिसेंबर रोजी मतदान होत असून, त्याअनुषंगाने प्रभाग क्र. १३ मध्ये शिवसेनेतर्फे जोरदार प्रचार रॅली काढण्यात आली.

या प्रभागात शिवसेनेचे उमेदवार रिंगणात उतरल्याने मतदारांमध्ये लक्षणीय उत्सुकता निर्माण झाली आहे. प्रभागातील नागरिकांकडून उमेदवारांना चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे निरीक्षणात आले आहे.

शिवसेना स्वतःच्या बळावर ही निवडणूक लढवत असून धनुष्यबाण चिन्हावर उमेदवार उतरल्यामुळे भाजप आणि महाविकास आघाडीच्या गणितात बदल होऊ शकतो, असा अंदाज राजकीय जाणकार सूत्रांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, या प्रभागात विविध पक्षांच्या नेत्यांच्या भेटी-­दौऱ्यांना वेग आला आहे.

प्रचार रॅलीदरम्यान कुणाल चोरडिया, विनोद मोहितकर, तसेच महिला (अ) गटातून किरण कुतरमारे आणि पुरुष (ब) गटातून धर्मेंद्र काकडे यांच्यासह शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Continue Reading

Previous: “वणीतील पाणीटंचाई संपवण्याची गर्जना; प्रभाग 2 व 8 मध्ये आघाडीचा जोरदार टप्पा”
Next: वणीच्या राजकारणात तापलेले वातावरण; शिवसेनेची शक्तिप्रदर्शन रॅली ठरली लक्षवेधी

Related Stories

SAVE_20260417_165025_11zon
  • वणी

पिंपळखुटी ते यवतमाळ १०० किमी पायी लाँग मार्च; शेतकरी, कामगार व योजना कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या

NewWaniDiary 17/04/2026
SAVE_20260413_151328
  • वणी

भीम टायगर सेनेतर्फे आज वणीमध्ये भव्य भीम गीतांचा कार्यक्रम व सत्कार सोहळा

NewWaniDiary 13/04/2026
SAVE_20260412_172132
  • वणी

मुकुटबन ग्रामपंचायतीची तपासणी वादात; राजकीय दबावाचे आरोप

NewWaniDiary 12/04/2026
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.