Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • चळवळ
  • वणी शहरातील; भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन संपन्न!
  • वणी
  • चळवळ

वणी शहरातील; भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन संपन्न!

NewWaniDiary 04/01/2025

वणी:- भीमा कोरेगाव विजयी शैर्य दिनाचे औचित्य साधून वणी शहरातील ‘द ग्रेट पिपल्स ग्रुप’ या सामाजिक संघटनेच्या वतीने दि. १ जाने. २०२५ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, वणी येथे सकाळी मानवंदना देऊन ७.३० वाजता मोफत रक्त गट तपासणी शिबीर घेण्यात आले.

तसेच सायंकाळी ६.३० वा. शुरविरांना अभिवादन आणि सन्मान समारंभाचा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमामध्ये सामाजिक कार्यकर्ते व शैक्षणिक व्यक्तींचा सन्मान करण्यात आला.

या कार्यक्रमाचे उ‌द्घाटक म्हणून वणीचे आमदार संजय देरकर, कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून विजय नगराळे व प्रमुख अतिथी म्हणून प्रा.पुरुषोत्तम पाटील, माजी नगराध्यक्ष करूणा कांबळे, सुरेश रायपूरे, मोरेश्वर देवतळे, ईत्यादी मान्यवर उपस्थित होते. त्यानंतर व्याख्याते दत्ता डोहे यांनी भिमा कोरेगांव शुरविरांचा इतिहास या विषयावर व्याख्यान झाले.

आणि दिवंगत आंबेडकरी चळवळीतील सक्रिय कार्यकर्ते सुरेश मोडक यांच्या सन्मानार्थ त्यांच्या पत्नीचा सन्मान करण्यात आला. तसेच समाजा मध्ये सामाजिक कार्यात व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्ती यावेळी रेखा पाटील,डॉ. स्नेहदिप मेंढे,अँड. विप्लव तेलतुंबडे,भीम टायगर सेनेचे जिल्हाध्यक्ष. योगेश रायपुरे,शिक्षिका.करमा तेलंग,ललिता तेलतुंबडे,आशावरकर माधुरी डोंगरे,प्रवीण वनकर,डॉ.संचिता नगराळे,मंगल तेलंग,शुभम डाहुले,कपिल मेश्राम, प्रणिता खोब्रागडे इत्यादी समाजबांधवांचे मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.


या कार्यक्रमाला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


कार्यक्रम यशस्वीतेसाठी द ग्रेट पिपल्स ग्रुपचे प्रमुख सदस्य दिनेश रायपुरे, प्रीतम बागडे,शुभम कडू,प्रियदर्श देवनाथ,निखिल ग‌ट्टेवार, हर्षा दि.रायपुरे,आशिष बागडे, अजय वावरे इत्यादी पदाधिकारी व समस्यांनी परिश्रम घेतले.

Continue Reading

Previous: क्रातिज्योती सावित्रीबाई फुले यांना द ग्रेट पिपल्स ग्रुपच्या वतीने अभिवादन
Next: वणी गोळीबारातील हुतात्म्यांना मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातर्फे अभिवादन

Related Stories

SAVE_20261019_125459
  • वणी

‘भाऊचा दांडिया’ उत्सवात काँग्रेस नेते संजय खाडे यांचा सत्कार

NewWaniDiary 19/10/2026
ChatGPT Image Oct 19, 2026, 09_57_08 AM_11zon
  • वणी

चिखलगावात आदिशक्ती दुर्गोत्सव मंडळाची भुतिया गुफा आकर्षणाचे केंद्र

NewWaniDiary 19/10/2026
ChatGPT Image Oct 17, 2026, 10_35_45 PM_11zon
  • वणी

वणी पोलीस ठाण्यातील अमरदीप दुर्गोत्सवाची ४२ वर्षांची परंपरा कायम

NewWaniDiary 17/10/2026
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.