Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • वणी
  • राष्ट्रीय कराटे स्पर्धेत वणीच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश
  • sport
  • वणी

राष्ट्रीय कराटे स्पर्धेत वणीच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

NewWaniDiary 16/06/2026

▪️ आभिर देठे ठरला ब्लॅक बेल्ट चॅम्पियन; वणीच्या कराटेपटूंनी पटकावली पदकांची लयलूट..

वणी (प्रतिनिधी) : दि. १३ व १४ जून २०२६ रोजी वर्धा जिल्ह्यातील देवळी येथे आयोजित राष्ट्रीय कराटे स्पर्धेत वणीच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.

स्पोर्ट शोतोकान कराटे-डो असोसिएशन ऑफ इंडिया यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत देशातील विविध राज्यांतील सुमारे एक हजार विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या स्पर्धेत वणीच्या कराटेपटूंनी उत्कृष्ट कौशल्याचे प्रदर्शन करत अनेक सुवर्ण, रौप्य व कांस्य पदके पटकावली.

या स्पर्धेतील १४ वर्षांखालील ब्लॅक बेल्ट चॅम्पियनशिपमध्ये आभिर हरेंद्र देठे याने प्रथम क्रमांक मिळवून ब्लॅक बेल्ट चॅम्पियनचा किताब पटकावला. तसेच सर्वाधिक पदके जिंकणाऱ्या संघाला प्रदान करण्यात येणारी टीम ट्रॉफीही वणीच्या संघाने मिळविली. काता आणि कुमिते या दोन्ही प्रकारांमध्ये खेळाडूंनी अप्रतिम कामगिरी करत यश संपादन केले.

या यशस्वी खेळाडूंना वणी येथील श्री गजानन महाराज मंदिर, न्यू व्हिजन शाळेजवळील ट्रेडिशनल शितो-र्यू कराटे अँड कोबुडो ऑर्गनायझेशन इंडिया या संस्थेच्या कराटे क्लबमध्ये प्रशिक्षण दिले जाते. विद्यार्थ्यांच्या या यशामागे मुख्य प्रशिक्षक सेन्साई नरेश मुरसकर, सेन्साई यशवंत टेकाम आणि अनिरुद्ध डाफे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे.

विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय पालक आणि प्रशिक्षकांना दिले असून त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल वणी शहरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

पदक विजेते विद्यार्थी :

• मीहिका महेंद्र देठे – २ सुवर्ण
• प्रांजली कविराज नाईक – २ सुवर्ण
• संस्कार श्रीकांत मेश्राम – २ सुवर्ण
• अदिती सुरेश डोंगे – १ सुवर्ण, १ रौप्य
• दीक्षा अमोल बागडे – १ सुवर्ण, १ रौप्य
• सर्वदा नरेश मुरसकर – १ सुवर्ण, १ रौप्य
• ईशिका महेंद्र देठे – १ सुवर्ण, १ कांस्य
• श्रावणी गजानन अलोणे – १ सुवर्ण, १ कांस्य
• आर्य अमोल मस्सेवार – १ सुवर्ण, १ कांस्य
• राजवी अनिल गंधारे – १ रौप्य, १ कांस्य
• आर्यन कैलास दास्सरवार – १ रौप्य, १ कांस्य
• स्वरा सचिन घाटोळे – १ रौप्य, १ कांस्य
• आर्वी सुमित मुथ्था – १ सुवर्ण १ कांस्य
• ओवी महेश ठाकरे – २ कांस्य
• श्रीहर्ष कैलास दास्सरवार – २ कांस्य

विद्यार्थ्यांच्या या नेत्रदीपक यशामुळे वणी शहराच्या क्रीडा क्षेत्रातील नावलौकिकात भर पडली असून भविष्यातही अशीच यशस्वी कामगिरी करण्याचा विश्वास प्रशिक्षकांनी व्यक्त केला.

Continue Reading

Previous: निर्गुडा नदी संकट : जबाबदार कोण?
Next: बारावा आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा; वणीत भव्य योगशिबिराचे आयोजन

Related Stories

ChatGPT Image Sep 1, 2026, 05_25_56 PM_11zon
  • वणी

संजय खाडेंनी लावून धरला प्रश्न; वणी–उकणी बससेवा अखेर सुरू

NewWaniDiary 01/09/2026
ChatGPT Image Aug 27, 2026, 03_28_47 PM_11zon
  • वणी

जम्मू खान यांचा सेवाभावी उपक्रम; ४१ गरजू विद्यार्थ्यांना नवीन सायकलींचे वाटप

NewWaniDiary 27/08/2026
ChatGPT Image Aug 25, 2026, 01_40_53 PM_11zon
  • वणी

प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जन्मदिनानिमित्त वणीत भव्य रक्तदान शिबिर

NewWaniDiary 25/08/2026
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.