Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • चळवळ
  • वणी शहरातील:पुस्तके भेट देऊन बाबासाहेबांना अभिवादन करण्याचे आवाहन..
  • वणी
  • चळवळ

वणी शहरातील:पुस्तके भेट देऊन बाबासाहेबांना अभिवादन करण्याचे आवाहन..

NewWaniDiary 13/04/2025

वणी : भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त द ग्रेट पिपल्स ग्रुप, वणी यांच्या वतीने दिनांक १४ एप्रिल रोजी सकाळी ७ वाजता पासून दुपारी १ वाजेपर्यंत वणी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात एक आगळीवेगळी अभिवादनाची संकल्पना राबविण्यात येत आहे. पारंपरिक पुष्पहार व पुष्पचक्र अर्पण करण्याऐवजी, पुस्तके भेट देऊन बाबासाहेबांना अभिवादन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या उपक्रमाचे उद्दिष्ट बाबासाहेबांनी दिलेला शिक्षणाचा मंत्र पुढे नेणे आणि समाजात वाचनाची आवड निर्माण करणे आहे. भेट दिलेली पुस्तके शहरातील व ग्रामीण वाचनालयांमध्ये पोहोचवली जातील. पुस्तके ही बाबासाहेबांच्या जीवनकार्यावर, भारतीय राज्यघटनेवर, स्पर्धा परीक्षांवर किंवा समाजजागृतीस उपयुक्त असावीत, असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी मो.9112078507 वर संपर्क साधा..

यावेळी प्रशासन अधिकारी, सामाजिक संस्था, पतसंस्था, समाजिक कार्यकर्ता व राजकीय नेत्यांनी देखील या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन ग्रुपकडून करण्यात आले आहे.

Continue Reading

Previous: सत्यम क्लॉथ सेंटर येथे; डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या कार्यक्रमासाठी पांढऱ्या साड्या व इतर कपडे ठोक भावात उपलब्ध..
Next: डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या आयोजनाच्या अनुषंगाने बैठक वणी पोलीस स्टेशन येथे पार पडली..

Related Stories

SAVE_20260417_165025_11zon
  • वणी

पिंपळखुटी ते यवतमाळ १०० किमी पायी लाँग मार्च; शेतकरी, कामगार व योजना कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या

NewWaniDiary 17/04/2026
SAVE_20260413_151328
  • वणी

भीम टायगर सेनेतर्फे आज वणीमध्ये भव्य भीम गीतांचा कार्यक्रम व सत्कार सोहळा

NewWaniDiary 13/04/2026
SAVE_20260412_172132
  • वणी

मुकुटबन ग्रामपंचायतीची तपासणी वादात; राजकीय दबावाचे आरोप

NewWaniDiary 12/04/2026
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.