Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • वणी
  • श्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेच्या विविध शाळांचा संयुक्त स्वातंत्र्यदिन उत्सव उत्साहात संपन्न
  • वणी

श्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेच्या विविध शाळांचा संयुक्त स्वातंत्र्यदिन उत्सव उत्साहात संपन्न

NewWaniDiary 15/08/2025

वणी (प्रतिनिधी) – श्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था संचालित वणी पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, राजर्षी शाहू महाराज हिंदी विद्यालय व औद्योगिक प्रशिक्षण केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्यदिन समारोह संस्थेच्या भव्य पटांगणात उत्साहात पार पडला.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्थेचे संस्थापक व सचिव ओमप्रकाश चचडा यांनी भूषविले. वणी पब्लिक स्कूलचे प्राचार्य राकेशकुमार देशपांडे, राजर्षी शाहू महाराज हिंदी विद्यालयाचे मुख्याध्यापक अभय पारखी व प्रायव्हेट इंडस्ट्रिअल ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचे प्राचार्य अतुल राजगडकर मंचावर उपस्थित होते. प्राचार्य राकेशकुमार देशपांडे यांनी ध्वजारोहण केले.

यावेळी विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर भाषणे, लेझीम नृत्य, वेशभूषा सादरीकरण तसेच विविध देशभक्तांचे जिवंत प्रतिकृतीदर्शक देखावे सादर करून वातावरण देशभक्तीमय केले. अध्यक्षीय भाषणात ओमप्रकाश चचडा यांनी स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानाची आठवण करून देत, स्वातंत्र्य टिकवण्याची जबाबदारी नवीन पिढीने पार पाडावी असे आवाहन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. जिगीषा कुलमेथे व कु. आशा प्रजापती (वणी पब्लिक स्कूल) यांनी केले, तर आभारप्रदर्शन कु. आकांक्षा तिवारी (राजर्षी शाहू महाराज हिंदी विद्यालय) हिने केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Continue Reading

Previous: मतदार यादी घोटाळ्याविरुद्ध काँग्रेसचा निर्धार — यवतमाळमध्ये कॅन्डल मार्च व मशाल मोर्चा
Next: वणीमध्ये हेमंत बृजवासींच्या भजन संध्येला कृष्णभक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Related Stories

SAVE_20260226_131159_11zon
  • वणी
  • घोन्सा

आदर्श हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, घोन्सा येथे माजी विद्यार्थी स्नेहमिलन उत्साहात

NewWaniDiary 26/02/2026
SAVE_20260225_203542_11zon
  • वणी

वनाधिकार कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणी साठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व किसान सभेने केले आंदोलन

NewWaniDiary 25/02/2026
SAVE_20260223_232242-1024x678.jpg
  • महाराष्ट्र
  • वणी

रायगड किल्ला येथे स्वच्छता अभियान; शिवसैनिकांकडून दोन महापुरुषांना मानवंदना

NewWaniDiary 23/02/2026
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.