Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • वणी
  • प्रभाग ५ मध्ये धनुष्यबाणाची ताकद; खोब्रागडे–पडोळे आघाडीवर, भाजपाशी काट्याची टक्कर
  • वणी
  • राजकीय

प्रभाग ५ मध्ये धनुष्यबाणाची ताकद; खोब्रागडे–पडोळे आघाडीवर, भाजपाशी काट्याची टक्कर

NewWaniDiary 01/12/2025

वणी (प्रतिनिधी): वणी नगरपरिषद निवडणुकीत आज प्रचाराचा शेवटचा दिवस असून शिवसेना (शिंदे गट) चे प्रभाग क्रमांक ५ मधील महिला गटाच्या उमेदवार गीता पडोळे आणि SC पुरुष गटातील अधिकृत उमेदवार संदीप खोब्रागडे यांच्या वतीने १ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता भव्य प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले.

या रॅलीला प्रभागातील मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विशेषतः तेली फैल, सिंधी कॉलनी आणि भीमनगर या भागांत संदीप खोब्रागडे हे पुरुष गटातील मतदारांच्या पहिल्या पसंतीचे उमेदवार म्हणून पुढे येत असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे या प्रभागात भाजपा आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यात काट्याची टक्कर होणार, अशी चर्चा रंगू लागली आहे.

प्रभागभर धनुष्यबाण चिन्हाकडे वाढते लक्ष व आकर्षण दिसून येत असून उमेदवारांविषयी सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे.

उद्या, दि. २ डिसेंबर रोजी सकाळी ७ वाजता मतदानाला सुरुवात होणार आहे.

Continue Reading

Previous: डॉ. सचिता नगराळे यांची ठाम भूमिका; वणीकरांची पहिली पसंती ठरताना
Next: वणी प्रभाग ५ मध्ये मतदानाच्या पूर्वसंध्येला तणाव; हेंडघ्या घरच्या कार्यालयात मतदार बोलावल्याच्या चर्चांना ऊत

Related Stories

ChatGPT Image Sep 1, 2026, 05_25_56 PM_11zon
  • वणी

संजय खाडेंनी लावून धरला प्रश्न; वणी–उकणी बससेवा अखेर सुरू

NewWaniDiary 01/09/2026
ChatGPT Image Aug 27, 2026, 03_28_47 PM_11zon
  • वणी

जम्मू खान यांचा सेवाभावी उपक्रम; ४१ गरजू विद्यार्थ्यांना नवीन सायकलींचे वाटप

NewWaniDiary 27/08/2026
ChatGPT Image Aug 25, 2026, 01_40_53 PM_11zon
  • वणी

प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जन्मदिनानिमित्त वणीत भव्य रक्तदान शिबिर

NewWaniDiary 25/08/2026
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.