Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • वणी
  • वणी प्रभाग ५ मध्ये मतदानाच्या पूर्वसंध्येला तणाव; हेंडघ्या घरच्या कार्यालयात मतदार बोलावल्याच्या चर्चांना ऊत
  • वणी

वणी प्रभाग ५ मध्ये मतदानाच्या पूर्वसंध्येला तणाव; हेंडघ्या घरच्या कार्यालयात मतदार बोलावल्याच्या चर्चांना ऊत

NewWaniDiary 02/12/2025

वणी (प्रतिनिधी): वणी नगरपरिषद निवडणुकीत दि. २ डिसेंबरला सकाळी ७ वाजता मतदान होणार असताना, त्याच्या आदल्या दिवशी म्हणजे दि. १ डिसेंबरच्या रात्री १० वाजल्यानंतर प्रभाग क्र. ५ मध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाल्याची माहिती मिळत आहे.

दलित वस्ती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या भागात काही युवक शेकोटी करून हेंडघ्या हाकण्यासाठी एकत्र बसलेले दिसून आले. त्याचवेळी, परिसरात मतदारांना पैसे वाटप केल्याच्या चर्चांनाही वेग आला आहे.

स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तेली फैलला लागून असलेल्या हेंडघ्याच्या स्थानिक कार्यालयात दामले फैल व भीम नगरातील काही मतदारांना फोन करून बोलावले जात असल्याचे, तसेच मतदानाच्या बदल्यात पैसे देण्याची ऑफर केल्याचे दावे समोर येत आहेत.

मतदान विकत घेण्यासारख्या संभाव्य प्रकारांना रोखण्यासाठी प्रभागातील विविध ठिकाणी तरुणांनी स्वयंस्फूर्तीने सतर्कतेने पहारा ठेवायला सुरुवात केली आहे.

दरम्यान, काही स्थानिकांनी असा आरोपही केला आहे की तेली फैल परिसरातील काही मंडळाचे जुगार संबंधित कामात गुंतलेले कार्यकर्ते दामले फैल व भीम नगर परिसरात मतदारांशी संपर्क साधत मतदानावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, हे दावे अद्याप अधिकृतरीत्या पुष्टी झालेले नाहीत.

एक वर्षा आधी वणी विधानसभाच्या निवडणूकीत संजीव ला पाडल्याचे काम हेंडघ्याने केले होते. आता या प्रभागातुन उमेदवार पराभूत झाल्याचे चित्र दिसत असून हेंडघ्याचे राजकारण आता संकटात सापडलेल्या आहे

या सर्व घडामोडींनंतर निवडणूक आयोग आणि पोलिस प्रशासनाने तातडीने चौकशी व आवश्यक कारवाई करावी, अशी जोरदार मागणी सामाजिक कार्यकर्त्यांकडून करण्यात आली आहे.

Continue Reading

Previous: प्रभाग ५ मध्ये धनुष्यबाणाची ताकद; खोब्रागडे–पडोळे आघाडीवर, भाजपाशी काट्याची टक्कर
Next: प्रभाग क्र. ५ मध्ये संदीप खोब्रागडे यांना मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Related Stories

ChatGPT Image Sep 1, 2026, 05_25_56 PM_11zon
  • वणी

संजय खाडेंनी लावून धरला प्रश्न; वणी–उकणी बससेवा अखेर सुरू

NewWaniDiary 01/09/2026
ChatGPT Image Aug 27, 2026, 03_28_47 PM_11zon
  • वणी

जम्मू खान यांचा सेवाभावी उपक्रम; ४१ गरजू विद्यार्थ्यांना नवीन सायकलींचे वाटप

NewWaniDiary 27/08/2026
ChatGPT Image Aug 25, 2026, 01_40_53 PM_11zon
  • वणी

प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जन्मदिनानिमित्त वणीत भव्य रक्तदान शिबिर

NewWaniDiary 25/08/2026
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.