Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • वणी
  • वणी शहरात नियमांना हरताळ – देशी-विदेशी दारू विक्रीवर नियंत्रणाचा अभाव, नागरिक त्रस्त
  • वणी

वणी शहरात नियमांना हरताळ – देशी-विदेशी दारू विक्रीवर नियंत्रणाचा अभाव, नागरिक त्रस्त

NewWaniDiary 07/06/2025


वणी : शहरात देशी-विदेशी दारू विक्रीच्या शासकीय नियमांची सर्रासपणे पायमल्ली होत असून, शहरातील व ग्रामीणभागातील काही परवानाधारक दुकाने सकाळी ७ वाजताच सुरू होत असल्याचे वास्तव उघड झाले आहे. शासनाने सकाळी १० नंतर दुकाने उघडण्याचा स्पष्ट नियम असतानाही त्याचे उल्लंघन होत असून, शहरातील धार्मिक स्थळे, शाळा, दवाखाने व सार्वजनिक स्थळांच्या अगदी शेजारीच दारू विक्री चालत आहे.

यामुळे मंदिरांमध्ये दर्शनासाठी येणारे भाविक, रुग्णालयातील रुग्ण, विद्यार्थी आणि पालक वर्ग यांना मद्यपींच्या वर्तनामुळे मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. शिवाय, सकाळच्या वेळेस रस्त्यावर आडवे मोटरसायकल ठेऊन मद्यपियीकडून शिवीगाळ, भांडणे व धिंगाणा सुरू असून, महिला व ज्येष्ठ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी व संबंधित यंत्रणा नियमांचे पालन न करता परवाने देत असून, वेळेच्या अटींचा भंग होतानाही कोणतीही कार्यवाही होत नसल्याने या विभागाच्या निष्क्रियतेबद्दल नाराजी व्यक्त केली जात आहे.

विशेष म्हणजे काही दुकानांमध्ये पार्किंगची सोयही नसल्याने रहिवाशांच्या जागांमध्ये बेकायदेशीर वापर होत आहे. त्यातच काही स्थानिक लोकप्रतिनिधी व क्षेत्रातले लोकप्रतिनिधीचे दारूचे दुकाने असून शहरातल्या नेतेमंडळींचा या प्रकारांना अप्रत्यक्ष पाठिंबा असल्याची जोरदार चर्चा आहे.

उत्पादन शुल्क विभागाकडून दारू विक्रीसाठी घालण्यात आलेल्या नियमांचे व अनुज्ञप्ती अटींचे उल्लंघन होऊनही कारवाईचा अभाव आहे. नागरिकांनी संबंधित अधिकाऱ्यांची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

– वणी, प्रतिनिधी: दिनेश रायपुरे

Continue Reading

Previous: सुजाता थिएटर,में 6 जून से रोज़ाना 4 शो में – ‘हाउसफुल 5’!
Next: डॉ. पीएसजी कुमार: ग्रंथालय माहिती विज्ञान क्षेत्रात अतुलनीय योगदान

Related Stories

SAVE_20260417_165025_11zon
  • वणी

पिंपळखुटी ते यवतमाळ १०० किमी पायी लाँग मार्च; शेतकरी, कामगार व योजना कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या

NewWaniDiary 17/04/2026
SAVE_20260413_151328
  • वणी

भीम टायगर सेनेतर्फे आज वणीमध्ये भव्य भीम गीतांचा कार्यक्रम व सत्कार सोहळा

NewWaniDiary 13/04/2026
SAVE_20260412_172132
  • वणी

मुकुटबन ग्रामपंचायतीची तपासणी वादात; राजकीय दबावाचे आरोप

NewWaniDiary 12/04/2026
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.