Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • वणी
  • वणी तालुक्यातील दोन पुलांवरील मोठे खडे; अपघाताची शक्यता वाढली
  • वणी

वणी तालुक्यातील दोन पुलांवरील मोठे खडे; अपघाताची शक्यता वाढली

NewWaniDiary 26/10/2025

वणी (प्रतिनिधी): वणी निर्गुडा पुलाजवळ तसेच चारगाव–शिरपूर मार्गावरील नदी पुलावर मोठे आणि जीवघेणे खडे पडले असून, त्यामुळे वाहनधारकांना गंभीर धोका निर्माण झाला आहे.

या मार्गाने दररोज विद्यार्थी, शासकीय कर्मचारी तसेच नागरिक मोटरसायकलने प्रवास करतात. गणेशपूर परिसरातील छोरिया लेआउटसह अनेक गावांना जोडणारा हा मार्ग अत्यंत महत्त्वाचा आहे. पुलावर पडलेल्या मोठ्या खड्यांमुळे कोणत्याही क्षणी अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

चारगाव नदी पुलावरसुद्धा अशीच अवस्था असून, हा मार्ग थेट चंद्रपूर जिल्ह्याशी जोडला गेल्याने या मार्गावर वाहतुकीचा ताण मोठ्या प्रमाणात आहे. विशेष म्हणजे, शिरपूरमार्गे येणारे ओव्हरलोड ट्रक पूल उतारात गिअर न्यूट्रल करून चालवतात. त्यामुळे वाहनावरील नियंत्रण सुटल्यास मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता वाढते.

स्थानिक व ग्रामीण नागरिकांनी तातडीने पुलावरील खड्यांमध्ये मुरूम किंवा गिट्टी टाकून रस्ता सुरळीत करण्याची मागणी केली आहे. अन्यथा गंभीर अपघात होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. नदी पुलाचे मोठे नुकसान होण्याच्या मार्गावर त्याकरिता संबंधित विभागीय अधिकारी आणि सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) यांनी तातडीने या मार्गाकडे लक्ष देण्याची गरज आहे.

Continue Reading

Previous: अनैतिक संबंधातून युवकाची निर्घृण हत्या; वणी पोलिसांची विजेगतीने उकल — दोन आरोपी अटकेत
Next: घटस्फोट एक गुन्हा की यल्गार?

Related Stories

SAVE_20260226_131159_11zon
  • वणी
  • घोन्सा

आदर्श हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, घोन्सा येथे माजी विद्यार्थी स्नेहमिलन उत्साहात

NewWaniDiary 26/02/2026
SAVE_20260225_203542_11zon
  • वणी

वनाधिकार कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणी साठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व किसान सभेने केले आंदोलन

NewWaniDiary 25/02/2026
SAVE_20260223_232242-1024x678.jpg
  • महाराष्ट्र
  • वणी

रायगड किल्ला येथे स्वच्छता अभियान; शिवसैनिकांकडून दोन महापुरुषांना मानवंदना

NewWaniDiary 23/02/2026
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.