




वणी : शहरात क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. 11 एप्रिल रोजी दामले नगर व शहर समितीच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. संध्याकाळी ५ वाजता विद्युत रोषणाई, डीजे आणि बँड पथकासह भव्य मिरवणूक शहरातील प्रमुख मार्गांवर काढण्यात आली.
या कार्यक्रमात माळी समाजाचे बांधव, विविध समाज संघटनांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि महिलांची व पुरुषांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

