Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • वणी
  • MIMचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला पाठिंबा; वणीतील राजकीय गणितात मोठा बदल
  • वणी
  • राजकीय

MIMचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला पाठिंबा; वणीतील राजकीय गणितात मोठा बदल

NewWaniDiary 22/11/2025

वणी (प्रतिनिधी): वणी नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दि. २२ नोव्हेंबर रोजी शेतकरी मंदिर, वणी येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत एमआयएम (MIM) पक्षाने राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला अधिकृत पाठिंबा जाहीर केला. या निर्णयानंतर वणी नगरपरिषद निवडणुकीचे राजकीय चित्र अधिकच रंगतदार झाले आहे.

एमआयएमचे प्रभाग क्र. ८, ९ आणि १० मधील चार उमेदवार निवडणुकीत रिंगणात आहेत. काही प्रभागांमध्ये दोन्ही पक्षांत मैत्रीपूर्ण सरळ लढत होणार असून, काही प्रभागांमध्ये युतीद्वारे नगराध्यक्ष आणि नगरसेवक उमेदवारांना विजय मिळवून देण्यासाठी संयुक्तपणे रणनिती आखण्यात येत आहे. निवडणूक ताकदीने, नियोजनबद्ध पद्धतीने आणि पूर्ण एकजुटीने लढवण्याचा निर्धार या पत्रकार परिषदेत व्यक्त करण्यात आला.

या नव्या राजकीय समीकरणामुळे भाजप आणि महाविकास आघाडीला मोठा फटका बसू शकतो, असा दावा पदाधिकाऱ्यांनी केला.

कार्यक्रमाला राष्ट्रवादी पक्षाचे वणी विधानसभा क्षेत्राध्यक्ष दिलीप भोयर, राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेश संघटन सचिव रज्जाक पठाण, एमआयएमचे शहराध्यक्ष आसिम हुसेन, तसेच दोन्ही पक्षांचे उमेदवार आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Continue Reading

Previous: महिला-तरुणांचा वाढता कल: प्रभाग ६ मध्ये डॉ. संचिता नगराळे लोकप्रियतेत अव्वल
Next: माजी आमदार बोदकुरवार यांच्या उपस्थितीत प्रभाग ५ मध्ये भाजपाचा जोरदार प्रचार

Related Stories

SAVE_20260226_131159_11zon
  • वणी
  • घोन्सा

आदर्श हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, घोन्सा येथे माजी विद्यार्थी स्नेहमिलन उत्साहात

NewWaniDiary 26/02/2026
SAVE_20260225_203542_11zon
  • वणी

वनाधिकार कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणी साठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व किसान सभेने केले आंदोलन

NewWaniDiary 25/02/2026
SAVE_20260223_232242-1024x678.jpg
  • महाराष्ट्र
  • वणी

रायगड किल्ला येथे स्वच्छता अभियान; शिवसैनिकांकडून दोन महापुरुषांना मानवंदना

NewWaniDiary 23/02/2026
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.