
वणी (प्रतिनिधी) : जागतिक महिला दिनानिमित्त रविवार दिनांक ८ मार्च २०२६ रोजी सकाळी १० ते २ या वेळेत नगराळे हॉस्पिटल, नांदेपेरा रोड, वणी येथे महिलांसाठी भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिराचे उद्घाटन किरण देरकर (अध्यक्ष, सन्मान स्त्रीशक्ती फाउंडेशन) यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमासाठी संस्थापिका एकविरा पतसंस्था मारेगाव यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.
शिबिरात स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. संचित्ता विजय नगराळे (M.B.B.S., M.D. – Gold Medalist, KEM Mumbai) या महिलांची तपासणी करून मार्गदर्शन करणार आहेत. तसेच आयुर्वेदाचार्य डॉ. सुवर्णा चरपे (BAMS, Dy.AC Pune) यांच्याकडून नाडी परीक्षण व पंचकर्माबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे.
विशेषतः महिलांची ‘गर्भाशय कॅन्सर’ तपासणी व लसीकरणाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले जाणार आहे.
नोंदणीसाठी इच्छुक महिलांनी खालील क्रमांकांवर संपर्क साधावा :
दवाखाना – ९८८१९६६५४१
कांचन देसकर – ८८०६६८६७७०
सुरेखा ढेंगळे – ९५१८३६७२६६
सविता बावणे – ७०३०८७९५४२
महिलांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
