Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • वणी
  • जागतिक महिला दिनानिमित्त मानवी हक्क सुरक्षा परिषदेतर्फे महिलांचा सन्मान
  • वणी

जागतिक महिला दिनानिमित्त मानवी हक्क सुरक्षा परिषदेतर्फे महिलांचा सन्मान

NewWaniDiary 09/03/2026

वणी (प्रतिनिधी) : जागतिक महिला दिनानिमित्त मानवी हक्क सुरक्षा परिषद (ट्रस्ट) तर्फे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला. समाजातील महिलांचे योगदान अधोरेखित करत त्यांच्या कार्याचा गौरव करण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम ८ मार्च रोजी सकाळी ११ वाजता वणी येथील नगर वाचनालयात आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मानवी हक्क सुरक्षा परिषदेचे राज्याध्यक्ष राजु धावंजेवार होते. यावेळी कार्यक्रमाच्या सत्कारमूर्ती नगर वाचनालयाच्या परिचारिका सौ. कल्पना रामजी राठोड यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. तसेच मानवी हक्क सुरक्षा परिषदेच्या महिला पदाधिकाऱ्यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला.
अध्यक्षीय भाषणात राजु धावंजेवार यांनी महिलांनी शिक्षण, सामाजिक कार्य, आरोग्य तसेच विविध क्षेत्रांत केलेल्या उल्लेखनीय कार्याचे कौतुक केले. कार्यक्रमात बोलताना मान्यवरांनी महिलांचे सशक्तीकरण हे समाजाच्या प्रगतीसाठी अत्यंत आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. महिलांना समान संधी व सुरक्षित वातावरण मिळाल्यास त्या समाजाच्या सर्वांगीण विकासात मोलाचे योगदान देऊ शकतात, असेही त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमाला मानवी हक्क सुरक्षा परिषदेचे परशुराम पोटे, ज्ञानेश्वर बोनगीनवार, सुरेश बन्सोड, अजय चन्ने, संजय चिंचोलकर, सुरेंद्र निब्रड, सौ. प्रमिला चौधरी, सौ. सुमित्रा नारायण गोडे, मनिषा निब्रड, तसेच नगर वाचनालयाचे कर्मचारी सुरेंद्र भाजिपाले, प्रमोद लोणारे यांच्यासह मानवी हक्क सुरक्षा परिषदेचे पदाधिकारी, सदस्य आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मानवी हक्क सुरक्षा परिषदेचे राज्य संघटक परशुराम पोटे यांनी केले, तर आभार प्रदर्शन सुरेश बन्सोड यांनी केले. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

Continue Reading

Previous: जागतिक महिला दिनानिमित्त महिलांची भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिर
Next: डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला अभिवादन करून सुरेशभाऊ रायपुरे यांचा वाढदिवस साजरा

Related Stories

SAVE_20260417_165025_11zon
  • वणी

पिंपळखुटी ते यवतमाळ १०० किमी पायी लाँग मार्च; शेतकरी, कामगार व योजना कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या

NewWaniDiary 17/04/2026
SAVE_20260413_151328
  • वणी

भीम टायगर सेनेतर्फे आज वणीमध्ये भव्य भीम गीतांचा कार्यक्रम व सत्कार सोहळा

NewWaniDiary 13/04/2026
SAVE_20260412_172132
  • वणी

मुकुटबन ग्रामपंचायतीची तपासणी वादात; राजकीय दबावाचे आरोप

NewWaniDiary 12/04/2026
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.