
वणी : शहरातील नगर परिषद जवळील भाजी मंडीसमोर आज दुपारी ३ वाजताच्या दरम्यान एक मोठा वृक्ष पडल्याने एक व्यक्ती जखमी झाले. या परिसरात अनेकांचे मोठे नुकसान झाले असे सांगण्यात येत आहे. घटनेमुळे परिसरातील वीज तार तुटून लाईन बंद झाली असून, पालिका कर्मचारी आणि लाईनमन घटनास्थळी पोहोचले असून रस्ता मोकळा करण्याचे काम सुरू आहे.
