Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • वणी
  • वणी शहरात मोटरसायकल चोरी प्रकरण उघड – एक आरोपी ताब्यात, दोन मोटरसायकल जप्त
  • वणी

वणी शहरात मोटरसायकल चोरी प्रकरण उघड – एक आरोपी ताब्यात, दोन मोटरसायकल जप्त

NewWaniDiary 26/07/2025

वणी (प्रतिनिधी) – वणी शहरातील दिपक चौपाटी परिसरातून रात्री ८:३० वाजता मारुती अर्जुन भानारकर (वय ६२, रा. भोईपुरा, वणी) यांची किंमत ७० हजार रुपये असलेली मोटरसायकल (क्रमांक MH-29 CC-1367) अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची तक्रार वणी पोलीस ठाण्यात दाखल झाली होती.

त्यानंतर पोलीसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने तपास सुरू केला असता एक संशयित इसम चोरी गेलेली मोटरसायकल घेऊन जाताना दिसला. त्याची विचारपूस केली असता त्याने आपले नाव चंद्रकांत उर्फ शेखर शंकर कुटारकार (वय २५, रा. गव्हा (कोल्ही), ता. समुद्रपूर, जि. वर्धा) असे सांगितले. आरोपीने मोटरसायकल पाच हजार रुपयांत गहाण ठेवल्याचेही कबूल केले.

तांत्रिक तपासानंतर पोलिसांनी आरोपीला शिताफीने ताब्यात घेतले व चोरी केलेली मोटरसायकल (MH-29 CC-1367) जप्त केली. चौकशीत आरोपीने नागपूर जिल्ह्यातील बुट्टीबोरी येथून आणखी एक मोटरसायकल (MH-35 Z-4194) चोरी केल्याची कबुली दिली.

एकूण जप्त मुद्देमाल:

  • वणी येथील मोटरसायकल – किंमत ₹70,000
  • बुट्टीबोरी येथील मोटरसायकल – किंमत ₹40,000
    एकूण किंमत: ₹1,10,000

सदर कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किंन्द्रे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार गोपाल उंबरकर व डिबी पथकातील पो.उप.नि. धिरज गुल्हाने, मोहम्मद वसिम, मोनेश्वर खंडरे, गणेश मेश्राम, नंदकुमार पुप्पलवार, गजानन कुळमेथे (वणी पोलीस) यांनी केली.

Continue Reading

Previous: वणी पब्लिक स्कूलमध्ये “एक पेड़ माँ के नाम” अभियानांतर्गत वृक्षारोपण
Next: अभियांत्रिकी विभागाच्या विलंबामुळे आपले सरकार सेवा केंद्रे ठप्प; नागरिक त्रस्त

Related Stories

ChatGPT Image Jul 5, 2026, 06_57_25 PM_11zon
  • वणी

निर्गुडा नदी पुलावरील सुमारे २० फूट कठडे तुटले; मोठ्या अपघाताची भीती, तातडीने दुरुस्तीची नागरिकांची मागणी

NewWaniDiary 05/07/2026
ChatGPT Image Jul 2, 2026, 03_43_04 PM_11zon
  • वणी

उकणी खंड-1 प्रकल्पग्रस्तांच्या साखळी उपोषणाला संजय खाडे यांची भेट; न्याय मिळेपर्यंत शेतकऱ्यांच्या पाठीशी राहण्याची ग्वाही

NewWaniDiary 02/07/2026
SAVE_20260628_213423_11zon
  • वणी

दामले फैल सार्वजनिक शौचालयाची दयनीय अवस्था; नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

NewWaniDiary 28/06/2026
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.