Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • वणी
  • लालगुडा ग्रामपंचायतीतील रस्त्यांची दयनीय अवस्था; आमदारांच्या लेआउटलगतही दुरुस्ती नाही
  • वणी

लालगुडा ग्रामपंचायतीतील रस्त्यांची दयनीय अवस्था; आमदारांच्या लेआउटलगतही दुरुस्ती नाही

NewWaniDiary 04/07/2025

वणी (प्रतिनिधी) – वणी शहरालगत असलेल्या लालगुडा ग्रामपंचायत हद्दीतील पटवारी कॉलनीच्या मागील रस्त्यांची स्थिती अत्यंत दयनीय झाली असून, तातडीने रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. विशेष म्हणजे, संबंधित रस्ता आमदार संजय देरकर यांच्या लेआउटला लागून असूनही, प्रशासनाकडून या समस्येकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात असल्याची नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.

सामाजिक कार्यकर्ते नारायण गोडे यांनी प्रशासनाच्या निष्क्रियतेवर जोरदार टीका करत सांगितले की, “या परिसरात केवळ तीन महिन्यांपूर्वी काही नवीन सिमेंट काँक्रीट रस्त्याचे काम करण्यात आले होते. मात्र, एवढ्या कमी कालावधीतच रस्त्याला तडे गेल्याचे दिसून येत असून, या कामाची सखोल चौकशी व्हावी.”

ते पुढे म्हणाले, “जर आमदारांच्या शेजारील परिसरातच असा रस्त्यांचा दर्जा असेल, तर इतर अंतर्गत भागांची काय अवस्था असेल, याची सहज कल्पना करता येते.”

स्थानिकांनी वारंवार तक्रारी करूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई न झाल्यामुळे पावसाळ्यात रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असून नागरिकांना जाने कठीण झाले आहे. नागरिकांनी या भागातील रस्त्यांची तातडीने डागडुजी करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.

Continue Reading

Previous: प्लास्टिक प्रदूषणामुळे समस्त जीवसृष्टीवर ओढवले संकट
Next: मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व किसान सभेचा वतीने वणी व पाटणबोरी येथे भव्य मोर्चा..

Related Stories

ChatGPT Image Sep 4, 2026, 03_01_27 PM_11zon
  • वणी
  • Happy Birthday

दिगंबर गोहोकार यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

NewWaniDiary 04/09/2026
ChatGPT Image Sep 1, 2026, 05_25_56 PM_11zon
  • वणी

संजय खाडेंनी लावून धरला प्रश्न; वणी–उकणी बससेवा अखेर सुरू

NewWaniDiary 01/09/2026
ChatGPT Image Aug 27, 2026, 03_28_47 PM_11zon
  • वणी

जम्मू खान यांचा सेवाभावी उपक्रम; ४१ गरजू विद्यार्थ्यांना नवीन सायकलींचे वाटप

NewWaniDiary 27/08/2026
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.