Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • वणी
  • वणी पब्लिक स्कूलमध्ये “एक पेड़ माँ के नाम” अभियानांतर्गत वृक्षारोपण
  • वणी

वणी पब्लिक स्कूलमध्ये “एक पेड़ माँ के नाम” अभियानांतर्गत वृक्षारोपण

NewWaniDiary 25/07/2025
शाळेच्या परिसरात वणी नगरपरिषदेचे उपमुख्याधिकारी वृक्षारोपण करताना

वणी (प्रतिनिधी): श्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था, वणी यांच्या वतीने संचालित वणी पब्लिक स्कूल येथे शासकीय अभियानांतर्गत विविध उपक्रम राबविण्यात आले. या अभियानातील महत्त्वाचा उपक्रम “एक पेड़ माँ के नाम” अंतर्गत शाळेच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले तसेच विद्यार्थ्यांनी आपल्या आईच्या नावाने घरी झाडे लावली.

या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुणे म्हणून वणी नगरपरिषद उपमुख्याधिकारी जयवंत सोनटक्के उपस्थित होते. ते अनुकंपा वारस हक्क योजनेतून नोकरीत रुजू होऊन आज महत्त्वाच्या पदावर कार्यरत असून जिल्हापातळीवर ओळखले जातात.

प्रमुख अतिथी म्हणून शिक्षण संस्थेचे सदस्य विक्रांत चचडा, औद्योगिक प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य अतुल राजगडकर, तसेच राजर्षी शाहू महाराज हिंदी विद्यालयाचे मुख्याध्यापक अभय पारखी उपस्थित होते. अध्यक्षस्थानी वणी पब्लिक स्कूलचे प्राचार्य राकेश देशपांडे होते.

आपल्या भाषणात उपमुख्याधिकारी जयवंत सोनटक्के म्हणाले की, “आई आणि वृक्ष हे दोघेही आपल्याला भरभरून देतात. यांच्यामुळेच जीवन सुंदर व समृद्ध होते. आज झाडे लावणे आणि त्यांचे संवर्धन करणे ही काळाची गरज आहे.”

प्राचार्य राकेश देशपांडे यांनी शासकीय अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध सहशालेय उपक्रमांची माहिती देत ‘एक पेड़ माँ के नाम’ या उपक्रमाचे महत्त्व स्पष्ट केले. विद्यार्थिनी कु. ओजस्वीनी तेलतुंबडे हिनेही वृक्षारोपणाच्या महत्त्वावर भाषण केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक कु. एकता गौरकार यांनी केले, सूत्रसंचालन सौ. प्रणोती खडसे यांनी केले तर आभारप्रदर्शन कु. अंकीता गोखरे हिने केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Continue Reading

Previous: देशाच्या शूर सैनिकांच्या बलिदानाच्या तुलनेत आपण कुठे आहोत?
Next: वणी शहरात मोटरसायकल चोरी प्रकरण उघड – एक आरोपी ताब्यात, दोन मोटरसायकल जप्त

Related Stories

ChatGPT Image Sep 1, 2026, 05_25_56 PM_11zon
  • वणी

संजय खाडेंनी लावून धरला प्रश्न; वणी–उकणी बससेवा अखेर सुरू

NewWaniDiary 01/09/2026
ChatGPT Image Aug 27, 2026, 03_28_47 PM_11zon
  • वणी

जम्मू खान यांचा सेवाभावी उपक्रम; ४१ गरजू विद्यार्थ्यांना नवीन सायकलींचे वाटप

NewWaniDiary 27/08/2026
ChatGPT Image Aug 25, 2026, 01_40_53 PM_11zon
  • वणी

प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जन्मदिनानिमित्त वणीत भव्य रक्तदान शिबिर

NewWaniDiary 25/08/2026
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.