Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • वणी
  • राजूर येथील;डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका केंद्राचे घवघवीत यश..
  • वणी

राजूर येथील;डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका केंद्राचे घवघवीत यश..

NewWaniDiary 20/04/2025

▪️MPSC परीक्षेत प्रशिक कांबळेची यशस्वी घौडदौड..

राजूर कॉलरी : ग्रामपंचायत राजूरद्वारे चालविण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका केंद्राला एक मानाचे यश लाभले आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) मार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत अभ्यासिकेचा विद्यार्थी प्रशिक अजय कांबळे याची यशस्वी निवड झाली आहे. त्याचप्रमाणे, राजूर येथीलच शिरीष वसंता मेंढे यांची देखील MPSC परीक्षेत निवड झाली असून, त्यांनी स्वतंत्ररीत्या अभ्यास करून हे यश संपादन केले आहे.

या यशाचे औचित्य साधून दिनांक १९ एप्रिल २०२५ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका केंद्र, राजूर कॉलरी येथे प्रशिक कांबळे याचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला ग्रामपंचायत राजूरच्या सरपंच सौ. विद्याताई डेव्हिड पेरकावार, माजी पंचायत समिती सदस्य अशोकभाऊ वानखेडे, डेव्हिडभाऊ पेरकावार, कॉ.ॲड. कुमारभाऊ मोहरमपुरी, अनिलभाऊ डवरे, रतन दारुंडे,यांचे समवेत अभ्यासिकेतील विद्यार्थी स्नेहल वाळके, बिल्डर वावरे, सतीश भुसारी,अमृत मोहरमपुरी, पीयूष कांबळे व इतर मान्यवरांची उपस्थिती लाभली होती.

प्रशिक कांबळे याचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. शिरीष मेंढे हे बाहेर असल्यामुळे ते कार्यक्रमास उपस्थित राहू शकले नाहीत, मात्र त्यांना भ्रमणध्वनीद्वारे शुभेच्छा देण्यात आल्या.

या प्रसंगी बोलताना सरपंच सौ. विद्याताई पेरकावार यांनी अभ्यासिकेच्या कामगिरीचे कौतुक करताना प्रशिक कांबळे याचे अभिनंदन केले. तसेच अभ्यासिकेतील सर्व विद्यार्थ्यांना अशीच यशस्वी वाटचाल करण्यासाठी शुभेच्छा दिल्या आणि अभ्यासिकेला अधिक पुस्तके पुरवण्याचे आश्वासन दिले.

Continue Reading

Previous: वणी शहरातील;मुला मुलींसाठी भव्य उन्हाळी प्रशिक्षण शिबीराचे आयोजन..
Next: वणी येथे:बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे आयोजन..

Related Stories

SAVE_20260226_131159_11zon
  • वणी
  • घोन्सा

आदर्श हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, घोन्सा येथे माजी विद्यार्थी स्नेहमिलन उत्साहात

NewWaniDiary 26/02/2026
SAVE_20260225_203542_11zon
  • वणी

वनाधिकार कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणी साठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व किसान सभेने केले आंदोलन

NewWaniDiary 25/02/2026
SAVE_20260223_232242-1024x678.jpg
  • महाराष्ट्र
  • वणी

रायगड किल्ला येथे स्वच्छता अभियान; शिवसैनिकांकडून दोन महापुरुषांना मानवंदना

NewWaniDiary 23/02/2026
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.