
वणी (प्रतिनिधी): उकणी-बेलसनी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी शनिवार, दि. २१ फेब्रुवारी रोजी बेलोरा चेकपोस्टवर चक्काजाम आंदोलन करत कोळसा वाहतूक रोखली. त्यामुळे वणी–चंद्रपूर मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली.
शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने काँग्रेसचे प्रदेश सचिव संजय खाडे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. उर्वरित १७० शेतकऱ्यांची सुमारे ६०० एकर जमीन संपादन, पुनर्वसन व नुकसानभरपाईचे प्रश्न प्रलंबित असल्याचा आरोप आंदोलकांनी केला.

वेकोलि अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन चर्चा केल्यानंतर शेतकऱ्यांना लेखी आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले. न्याय न मिळाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला.
