Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • वणी
  • गॅस सिलेंडरच्या OTP बाबत वणीत नागरिकांच्या तक्रारी
  • वणी

गॅस सिलेंडरच्या OTP बाबत वणीत नागरिकांच्या तक्रारी

NewWaniDiary 17/09/2026

▪️ सिलेंडर न मिळाल्याचा आरोप; एका प्रकरणात महिलेचा मोबाईलही गायब झाल्याची तक्रार..

वणी (प्रतिनिधी) : वणी शहरातील भीमनगर व आनंदनगर परिसरात गॅस सिलेंडर वितरणाच्या वेळी OTP घेण्याच्या प्रकाराबाबत नागरिकांच्या तक्रारी समोर आल्या आहेत. मागील काही दिवसांत काही महिलांनी ऑनलाईन गॅस सिलेंडर बुकिंग केल्यानंतर वितरणासाठी आलेल्या व्यक्तींनी OTP घेतला; मात्र त्यानंतर सिलेंडर घरी पोहोचला नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

भीमनगर परिसरातील नागरिकांच्या म्हणण्यानुसार, मागील सुमारे वीस दिवसांत काही नागरिकांनी गांधी चौकातील HP गॅस एजन्सीकडे ऑनलाईन सिलेंडर बुकिंग केले होते. सिलेंडर वितरणासाठी आलेल्या व्यक्तीने संबंधित महिलांकडून OTP घेतला. मात्र OTP दिल्यानंतरही सिलेंडर घरी पोहोचला नसल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. याबाबत नागरिकांनी गॅस एजन्सीच्या कार्यालयात जाऊन एजन्सी मालकाला माहिती दिल्याचे सांगण्यात येते. सिलेंडर वितरणासाठी वापरण्यात येणाऱ्या ऑटोचालकाने OTP घेतल्याचे नागरिकांचे म्हणणे असून, संबंधित व्यक्तीचा मोबाईल सध्या बंद येत असल्याचेही सांगण्यात आले.

या प्रकरणी एजन्सीकडे तक्रार करूनही अद्याप समाधानकारक तोडगा निघाला नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. भीमनगर परिसरात मोठ्या प्रमाणात मजूर व सर्वसामान्य नागरिक वास्तव्यास आहेत. अशा नागरिकांकडून OTP घेऊन सिलेंडर न मिळाल्याची तक्रार समोर येत असल्याने या प्रकरणाची गांभीर्याने चौकशी होणे आवश्यक असल्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. संबंधित सिलेंडर नेमका कुठे गेला आणि OTP घेतल्यानंतर वितरणाची नोंद कशी झाली, याची तपासणी करण्याची मागणी करण्यात येत आहे.

दरम्यान, १५ सप्टेंबर रोजी आनंदनगर परिसरात आणखी एक प्रकार समोर आल्याचे सांगण्यात येत आहे. एका महिलेने इंडियन गॅस सिलेंडर बुक केला होता. सिलेंडर घेऊन आलेल्या व्यक्तीने OTP सांगण्यासाठी मोबाईल मागितला. मोबाईलचा वापर करण्याची माहिती नसल्याने महिलेने OTP घेण्यासाठी आपला मोबाईल संबंधित व्यक्तीकडे दिल्याचे सांगण्यात येते. त्यानंतर काही वेळाने मोबाईल घरात दिसून न आल्याने महिलेच्या मुलाने घरात शोध घेतला.

यानंतर महिलेच्या मुलाने संबंधित सिलेंडर वितरण करणाऱ्या व्यक्तीशी संपर्क साधून, OTP घेण्यासाठी मोबाईल दिला होता, तो मोबाईल परत आणून देण्याची मागणी केली. मोबाईल परत न मिळाल्यास पोलिसांत तक्रार करण्याचा इशाराही देण्यात आल्याचे सांगण्यात येते.

या घटनांमुळे गॅस सिलेंडर वितरणाच्या वेळी OTP तसेच मोबाईलच्या सुरक्षेबाबत नागरिकांनी विशेष सावधगिरी बाळगण्याची गरज निर्माण झाली आहे. अनोळखी व्यक्तीला मोबाईल हातात देणे किंवा OTP सांगणे टाळावे. तसेच सिलेंडर मिळाल्यानंतर बुकिंगची नोंद व वितरणाची पावती तपासावी, असे आवाहन सामाजिक कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे.

या प्रकरणांबाबत संबंधित गॅस एजन्सीची अधिकृत बाजू तसेच पोलिसांकडून चौकशी झाल्यास त्यानुसार पुढील माहिती स्पष्ट होऊ शकते.

Continue Reading

Previous: वणी बसस्थानकातील स्वच्छतागृहांच्या दुरवस्थेमुळे प्रवाशांत नाराजी
Next: भांदेवाडा परिसरातील जिओ टॉवरमधील डिझेल व बॅटरी चोरीप्रकरणी दोघांना अटक

Related Stories

ChatGPT Image Oct 19, 2026, 09_57_08 AM_11zon
  • वणी

चिखलगावात आदिशक्ती दुर्गोत्सव मंडळाची भुतिया गुफा आकर्षणाचे केंद्र

NewWaniDiary 19/10/2026
ChatGPT Image Oct 17, 2026, 10_35_45 PM_11zon
  • वणी

वणी पोलीस ठाण्यातील अमरदीप दुर्गोत्सवाची ४२ वर्षांची परंपरा कायम

NewWaniDiary 17/10/2026
SAVE_20261017_125731
  • वणी

राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्याशी झालेल्या गैरवर्तनाच्या निषेधार्थ वणीत काँग्रेसचा मोर्चा

NewWaniDiary 17/10/2026
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.