Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • वणी
  • वणी बसस्थानकातील स्वच्छतागृहांच्या दुरवस्थेमुळे प्रवाशांत नाराजी
  • वणी

वणी बसस्थानकातील स्वच्छतागृहांच्या दुरवस्थेमुळे प्रवाशांत नाराजी

NewWaniDiary 16/09/2026


▪️ चार दिवसांपासून पाण्याचा प्रश्न; दुर्गंधी व अस्वच्छतेने प्रवासी त्रस्त..

वणी (प्रतिनिधी) : वणी बसस्थानकातील स्वच्छतागृहांमध्ये मागील चार दिवसांपासून शौचास जाण्यासाठी निशुल्क असून पुरेशा सुविधा उपलब्ध नसल्याने प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. त्याठिकाणी देकरेख करिता सफाई कामगार नसल्यामुळे स्वच्छतागृहात पाणी नसणे, शौचास जाण्यासाठी आवश्यक पाण्याची व्यवस्था नसणे, टाकीत पाणी नसणे, पाणी घेण्याचे बकेट-डबके नसणे, अस्वच्छता तसेच दुर्गंधी यामुळे प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.

बसस्थानकात दररोज मोठ्या संख्येने नागरिक व प्रवासी ये-जा करतात. मात्र स्वच्छतागृहांची नियमित स्वच्छता आणि पाण्याची आवश्यक व्यवस्था होत नसल्याने परिसरात अस्वच्छ वातावरण निर्माण झाले आहे. दुर्गंधीमुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत असून, या परिस्थितीमुळे आरोग्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे.

प्रवाशांच्या मूलभूत सुविधांकडे संबंधित परिवहन विभागाने तातडीने लक्ष देऊन स्वच्छतागृहांची नियमित स्वच्छता, पाण्याची व्यवस्था आणि आवश्यक दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. तसेच संबंधित लोकप्रतिनिधींनीही या समस्येची दखल घेऊन प्रवाशांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पाठपुरावा करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Continue Reading

Previous: पर्यावरण संवर्धन आणि स्वदेशीचा संदेश देण्यासाठी भाजपकडून ‘बाप्पा माझा स्पर्धाचे आयोजन
Next: गॅस सिलेंडरच्या OTP बाबत वणीत नागरिकांच्या तक्रारी

Related Stories

ChatGPT Image Oct 19, 2026, 09_57_08 AM_11zon
  • वणी

चिखलगावात आदिशक्ती दुर्गोत्सव मंडळाची भुतिया गुफा आकर्षणाचे केंद्र

NewWaniDiary 19/10/2026
ChatGPT Image Oct 17, 2026, 10_35_45 PM_11zon
  • वणी

वणी पोलीस ठाण्यातील अमरदीप दुर्गोत्सवाची ४२ वर्षांची परंपरा कायम

NewWaniDiary 17/10/2026
SAVE_20261017_125731
  • वणी

राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्याशी झालेल्या गैरवर्तनाच्या निषेधार्थ वणीत काँग्रेसचा मोर्चा

NewWaniDiary 17/10/2026
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.