Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • वणी
  • मोहद येथे संभाजी ब्रिगेडतर्फे विद्यार्थ्यांना शालेय बॅगांचे वाटप
  • वणी

मोहद येथे संभाजी ब्रिगेडतर्फे विद्यार्थ्यांना शालेय बॅगांचे वाटप

NewWaniDiary 02/09/2025

वणी (प्रतिनिधी) – ता. वणी, जि. यवतमाळ येथील संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष व छत्रपती महोत्सव समितीचे अध्यक्ष गणेश बोंडे यांच्या वाढदिवसानिमित्त आज दि. 2 सप्टेंबर 2025 रोजी जिल्हा परिषद शाळा, मोहद येथे विद्यार्थ्यांना शालेय बॅगांचे वाटप करण्यात आले.

गणेश बोंडे हे सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रमांतून सतत समाजजागृतीचे कार्य करीत असून, त्यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी समाजोपयोगी उपक्रम राबविले जातात. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज जयंती महोत्सवाचे आयोजन, व्याख्यानमालेद्वारे समाजप्रबोधन तसेच 19 फेब्रुवारी 2025 रोजी सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करून अनेक गरीब कुटुंबातील मुला-मुलींचे विवाह लावून दिले आहे.

कार्यक्रमात मार्गदर्शन करताना संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अजय धोबे यांनी विद्यार्थ्यांना शालेय भिंतीवरील सुविचारांचे वाचन व आचरण करण्याचे महत्त्व पटवून दिले.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मुख्याध्यापक वाघमारे सर यांनी भूषविले. प्रमुख पाहुणे म्हणून मराठा सेवा संघाचे भाऊसाहेब आसूटकर, संभाजी ब्रिगेडचे आशिष रींगोले, माजी सरपंच वामनराव उईके, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संदीप ढुमणे, माजी उपसरपंच विशालभाऊ कुचनकर व प्रतिष्ठित नागरिक श्रीकांत कुचनकर आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजकुमार वडस्कर यांनी केले तर आभार प्रदर्शन राहुल पावडे यांनी केले.
या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अमोल शेलवडे, वैभव मडावी, अमोल पुनवटकर, श्रीकांत देठे, स्वप्नील बोथले, गजानन टेकाम यांनी विशेष परिश्रम घेतले.

Continue Reading

Previous: बोगस डॉक्टरांकडून वणी तालुक्यात मोठी लूट!
Next: भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य: श्री. विजयजी चोरडिया आपणास वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! 💐

Related Stories

SAVE_20260417_165025_11zon
  • वणी

पिंपळखुटी ते यवतमाळ १०० किमी पायी लाँग मार्च; शेतकरी, कामगार व योजना कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या

NewWaniDiary 17/04/2026
SAVE_20260413_151328
  • वणी

भीम टायगर सेनेतर्फे आज वणीमध्ये भव्य भीम गीतांचा कार्यक्रम व सत्कार सोहळा

NewWaniDiary 13/04/2026
SAVE_20260412_172132
  • वणी

मुकुटबन ग्रामपंचायतीची तपासणी वादात; राजकीय दबावाचे आरोप

NewWaniDiary 12/04/2026
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.