
वणी (प्रतिनिधी): वणी–यवतमाळ मार्गावरील लालपुलिया परिसरात गुल पेट्रोल पंपसमोर बुधवारी (19 नोव्हेंबर) दुपारी स्कूटीला ट्रकची जोरदार धडक बसून एका महिलेचा जागीच मृत्यू झाला. पेट्रोल भरवून रस्त्यावर वळताच मारेगावकडून येणाऱ्या ट्रकने त्यांना चिरडले.
वणी पोलिसांनी ट्रक जप्त करून चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून मृत महिलेच्या मागे पती, दोन मुली व एक मुलगा असा परिवार आहे.
