Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • वणी
  • शिरपुर पोलिसांनी ATM मधून पैसे चोरी करणाऱ्या दोन आरोपींना अटक..
  • वणी

शिरपुर पोलिसांनी ATM मधून पैसे चोरी करणाऱ्या दोन आरोपींना अटक..

NewWaniDiary 12/03/2025

वणी – शिरपुर पोलिसांनी ATM मधून पैसे चोरी करणाऱ्या दोन आरोपींना अटक केली आहे. चारगाव चौकी येथील हिताची कंपनीच्या ATM मध्ये हे दोघे प्लास्टिक पट्टीचा वापर करून पैसे काढण्याचा प्रयत्न करत होते. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत त्यांना रंगेहात पकडले. चौकशीत त्यांनी 22 फेब्रुवारी 2025 रोजीही 10,000 रुपये चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी CCTV फुटेजच्या आधारे याची पुष्टी करून गुन्हा नोंदवला आणि चोरीचे 10,000 रुपये जप्त केले.

अटक आरोपींची नावे सुशिल वसंत तोडेकर (36, बल्लारपूर, जि. चंद्रपूर) आणि नरेश रामदास घुगुल (33, बल्लारपूर, जि. चंद्रपूर) अशी आहेत. त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे. ही कारवाई वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपुर पोलिसांनी केली.

Continue Reading

Previous: विनापरवानगी व नियमांचे उल्लंघन करणाऱ्या भोंग्यांविरुद्ध नियमानुसार कारवाई करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Next: भारतीय कोळसा खाण कामगार युनियन वणी-ताडाळी तर्फे आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा!

Related Stories

ChatGPT Image Jul 5, 2026, 06_57_25 PM_11zon
  • वणी

निर्गुडा नदी पुलावरील सुमारे २० फूट कठडे तुटले; मोठ्या अपघाताची भीती, तातडीने दुरुस्तीची नागरिकांची मागणी

NewWaniDiary 05/07/2026
ChatGPT Image Jul 2, 2026, 03_43_04 PM_11zon
  • वणी

उकणी खंड-1 प्रकल्पग्रस्तांच्या साखळी उपोषणाला संजय खाडे यांची भेट; न्याय मिळेपर्यंत शेतकऱ्यांच्या पाठीशी राहण्याची ग्वाही

NewWaniDiary 02/07/2026
SAVE_20260628_213423_11zon
  • वणी

दामले फैल सार्वजनिक शौचालयाची दयनीय अवस्था; नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

NewWaniDiary 28/06/2026
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.