
वणी – शिवसेना (शिंदे गट) वणी शहरप्रमुख ललित लांजेवार (45) यांचे बुधवारी रात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या राहत्या घरी झटका आल्यानंतर तातडीने रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
ललित लांजेवार हे राजकीय क्षेत्रात परिचित व लोकप्रिय होते. त्यांच्या निधनाने कुटुंबीय, मित्रपरिवार आणि पक्षसमर्थकांमध्ये शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा आणि मुलगी आहेत.
